कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र समितीचे अध्यक्ष दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: November 19, 2023 19:10 IST2023-11-19T19:10:32+5:302023-11-19T19:10:41+5:30
निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या नागपूर व अमरावती विभागात बैठकी

कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र समितीचे अध्यक्ष दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर
अमरावती: मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठित समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे व समिती सदस्य २१ ते २३ नोव्हेंबरदरम्यान विदर्भ दौऱ्यावर येत आहे.
अमरावती येथे २२ नोव्हेंबरला व २३ नोव्हेंबरला नागपूर येथे विभागीय आयुक्त कार्यालयातील बैठकीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांशी न्या. शिंदे हे संवाद करतील. बैठकीत जिल्हाधिकारी व जिल्हा समिती सदस्य उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर संबंधित जिल्हाधिकारी यांच्याद्वारा जिल्ह्याचे वैयक्तिक सादरीकरण करणार आहेत. बैठकीला विभागीय आयुक्तांसह सर्व जिल्हाधिकारी, सर्व सीईओ, पोलिस महानिरीक्षक, पोलिस आयुक्त, मुद्रांक जिल्हाधिकारी, उपसंचालक भूमी अभिलेख, जिल्हा कारागृह अधीक्षक व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क उपस्थित राहणार आहे.