विद्यापीठाच्या विधी अधिकाऱ्यावर उगारली खुर्ची
By Admin | Updated: September 13, 2014 00:48 IST2014-09-13T00:48:16+5:302014-09-13T00:48:16+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची अधिग्रहित केलेली जमीन सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांचे बनावट निकाल ...

विद्यापीठाच्या विधी अधिकाऱ्यावर उगारली खुर्ची
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची अधिग्रहित केलेली जमीन सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांचे बनावट निकाल सादर करुन कुलगुरु व कुलसचिवांंनी परस्पर विकली, असा आरोप शुक्रवारी दुपारी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. यावेळी आंदोलनाचा पावित्रा घेऊन युवासेनेने कुलगुरु यांच्या दालनात बसलेले विद्यापीठाचे विधी अधिकारी यांच्यावर खुर्ची उगारल्याने खळबळ उडाली होती.
कुलगुरु व व्यवस्थापन समीतीचे सर्व सदस्यांनी आदेश नसताना न्यायालयाचा अवमान करुन त्यांच्या नावावर निकाल सादर केला व विद्यापीठाला अती महत्त्वाची संपत्ती जमीन मालकाशी सगंनमत करुन त्याला परत मिळवून दिली, असा आरोप युवा सेनेने केला असून जमीन परत मिळवून देण्याची बाब शासनाला कळविणे गरजेचे होते. तसेच कायद्यात ते बंधनकारकही आहे. तरीसुध्दा विद्यापीठाने शासनाला का कळविले नाही, असा प्रश्न युवा सेनेने उपस्थित केला आहे.
या सर्व बाबींवर प्रकाश टाकत युवा सेनेने विद्यापीठाने बनावट निकाल काढून कसा तयार केला याबाबत सीबीआय व व्हिजीलंस विभागाकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी युवा सेनेने केली आहे.