रस्ता रुंदीकरणासाठी नेरपिंगळाईत साखळी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:03 IST2021-07-13T04:03:59+5:302021-07-13T04:03:59+5:30

-------------- जुगारीकडून इसमाला मारहाण ब्राह्मणवाडा थडी : नजीकच्या घाटलाडकी येथे जुगार खेळण्यासाठी आईकडे पैसे मागणाऱ्या संदीप मामदेव कळसकर याला ...

Chain fast in Nerpingalai for road widening | रस्ता रुंदीकरणासाठी नेरपिंगळाईत साखळी उपोषण

रस्ता रुंदीकरणासाठी नेरपिंगळाईत साखळी उपोषण

--------------

जुगारीकडून इसमाला मारहाण

ब्राह्मणवाडा थडी : नजीकच्या घाटलाडकी येथे जुगार खेळण्यासाठी आईकडे पैसे मागणाऱ्या संदीप मामदेव कळसकर याला समजाविण्यासाठी गेलेल्या मोहन हिंमतराव बेहरे यांना त्याने इंधनाची काठी मारून जखमी केले. १० जुलै रोजी ही घटना घडली. ब्राह्मणवाडा थडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

---------

काकडा शिवारातून शेतीपयोगी साहित्य लंपास

पथ्रोट : नजीकच्या काकडा शिवारातील अमोल राजेंद्र बोंडे (रा. काकडा) यांच्या शेतातून ९० हजार ५०० रुपयांचे शेतीपयोगी साहित्य झोपडीचे कुलूप तोडून लंपास करण्यात आले. पथ्रोट पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

-------------

चुलत दिराने पुरविला महिलेचा पिच्छा

वरूड : तालुक्यातील फत्तेपूर येथे आशिष दिलीप चव्हाण (२५) या चुलत दिराच्या मोबाईलवरून ऑनलाईन खरेदी केल्यानंतर वाढलेल्या जवळिकीचा फायदा घेत त्याने वहिनीचा पिच्छा पुरविला. अखेर कंटाळून वरूड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. तो बदनामीची धमकी देत होता, असे तक्रारीत नमूद आहे. पोलिसांनी रविवारी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: Chain fast in Nerpingalai for road widening