सीईओंनी घेतला नांदगाव तालुक्याचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:13 IST2021-04-27T04:13:53+5:302021-04-27T04:13:53+5:30
नांदगाव खंडेश्वर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी नांदगाव खंडेश्वर येथील कोविड केअर सेंटर व कोविड ...

सीईओंनी घेतला नांदगाव तालुक्याचा आढावा
नांदगाव खंडेश्वर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी नांदगाव खंडेश्वर येथील कोविड केअर सेंटर व कोविड हेल्थ सेंटरला सोमवारी भेट देऊन पाहणी केली. येथील रुग्णांबद्दल माहिती घेतली. तसेच नंतर पापळ आरोग्य केंद्राला भेट देऊन आढावा घेतला.
वाफारा सप्ताहबद्दल जनजागरण तसेच कोरोना संदर्भात तपासणी वाढवा व लसीकरणाच्या कामाला गती द्या, अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या. पापळ येथे ग्रामसेवक, तलाठी व ग्राम दक्षता समितीसोबत कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत व कंटेनमेंट झोनबाबत चर्चा करून आढावा घेतला.
यावेळी गटविकास अधिकारी विनोद खेडकर, तहसीलदार किशोर यादव, मुख्याधिकारी मीनाक्षी यादव, सहायक गटविकास अधिकारी विठ्ठलराव जाधव, ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षिका प्रवीना देशमुख, तालुका वैद्यकीय अधिकारी साहेबराव इंगळे, सहायक पोलीस निरीक्षक सलीम चव्हाण, पापळ येथील वैद्यकीय अधिकारी अशोक लांडगे, आरोग्य विस्तार अधिकारी कमल धुर्वे व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.