सीईओंनी घेतला २४ योजनांचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2016 00:13 IST2016-04-14T00:13:33+5:302016-04-14T00:13:33+5:30
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांपैकी २४ योजनांचा मंगळवारी मुख्यकार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला.

सीईओंनी घेतला २४ योजनांचा आढावा
बैठक : गटविकास अधिकाऱ्यांना दिल्यात सूचना
अमरावती : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांपैकी २४ योजनांचा मंगळवारी मुख्यकार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला.
शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या नवीन उपक्रमाची माहिती सुध्दा १४ पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. यावेळी एनआरएलएम योजना, शौचालय निमितीचे उदिष्ट पूर्ण करणे, रमाई आवास, शबरी आवास योजनांची प्रगती, करवसुली (घरकर, पाणीपट्टी) व मूल्याधारित कर आकारणी बाबत अंमलबजावणी, सेवा हमी कायदा अंमलबजावणी, १३ वित्त आयोगाचा खर्च आणि १४ व्या वित्त आयोगाची अंमलबजावणी, स्वच्छ भारत मिशन, १० टक्के महिला व बालकल्याण तरतुदीतील खर्च, २० टक्के समाज कल्याण तरतूद खर्च, ३ टक्के अपंग तरतूद खर्चाचा आढावा घेण्यात आला. याशिवाय अंगणवाडी इमारत बांधकाम प्रगती, दलित वस्ती सुधार योजना, बायोगॅस बांधकाम प्रगती, प्रलंबित लेखा आक्षेप स्थानिक निधी महालेखापाल, धडक सिंचन विहीर, मनरेगा विहीर, पाणी टंचाईबाबत आढावा, जलयुक्त शिवार, आणि बांधकामविषयक ३१ मार्चपूर्वी कामे व खर्चाबाबत आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडून घेतला.
यावेळी जे.एन आभाळे, प्रकाश तट्टे, संजय इंगळे आदींनी त्यांच्या अधिनस्त असलेल्या विविध योजना व कामकाजाबाबत आढावा घेवून शासनाच्या नवीन उपक्रमाची माहिती सभेत दिली.