सीईओ, सभापती यांच्यात जुंपली
By Admin | Updated: March 19, 2015 00:17 IST2015-03-19T00:17:17+5:302015-03-19T00:17:17+5:30
स्थानिक पंचायत समितीच्या वाहनावर कायमस्वरूपी वाहनचालकांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावरून शाब्दिक वाद झाल्याने अमरावती पंचायत समितीच्या सभापतीविरूध्द ...

सीईओ, सभापती यांच्यात जुंपली
अमरावती : स्थानिक पंचायत समितीच्या वाहनावर कायमस्वरूपी वाहनचालकांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावरून शाब्दिक वाद झाल्याने अमरावती पंचायत समितीच्या सभापतीविरूध्द गाडगेनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
स्थानिक पंचायत समितीच्या वाहनासाठी सध्या तातपुरता वाहन चालक असल्याने याऐवजी नियमित वाहन चालक देण्याची मागणी चार महिन्यांपासून सभापतींनी जि.प. प्रशासनाकडे केली होती. मात्र यावर निर्णय न होत असल्याने याबाबत विचारणा करण्यासाठी सभापती आशिष धर्माळे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांच्याशी असभ्य वर्तन करून सईईओंसोबत शाब्दिक वाद घातला. माहितीनुसार पंचायत समितीच्या वाहनासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने तातपुरत्या स्वरूपात वाहनचालक दिला आहे. त्याऐवजी कायमस्वरूपी वाहनचालक देण्याकरिता सभापतींनी जिल्हा परिषदेकडे चार महिन्यांपासून पाठपुरावा केला होता. मात्र यावर अद्यापपर्यंतही प्रशासनाने कारवाई केली नसल्याने मंगळवारी सभापती आशिष धर्माळे हे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या दालनात पोहोचले. त्यांनी वाहनचालकांच्या प्रस्तावाबाबत भंडारी यांना विचारणा केली. यावर सीईओनी त्यांना कारवाई होत असल्याचे सांगितले.