केंद्रीय पध्दतीने अकरावीचे प्रवेश; लगबग सुरू
By Admin | Updated: June 11, 2015 00:13 IST2015-06-11T00:13:21+5:302015-06-11T00:13:21+5:30
दहावीचा निकाल घोषित झाल्यानंतर १५ जून रोजी गुणपत्रिकांचे वितरण होईल. पश्चात ११ वीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ...

केंद्रीय पध्दतीने अकरावीचे प्रवेश; लगबग सुरू
अमरावती : दहावीचा निकाल घोषित झाल्यानंतर १५ जून रोजी गुणपत्रिकांचे वितरण होईल. पश्चात ११ वीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पध्दतीने सुरू होईल. यासंदर्भात मंगळवारी बियाणी महाविद्यालयात बैठक घेण्यात आली.
केंद्रीय पध्दतीने प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी बैैठकीत नियोजन आखण्यात आले. यावेळी शिक्षण उपसंचालक राम पवार, सहायक उपसंचालक सुशील पाटील, निरीक्षक ए.बी. पाचघरे, मुकुंद घडेकर, समिती अध्यक्ष प्राचार्य एस.बी. लोहिया, माध्यमिक शिक्षणाधिकारी ए.एस. राठोड, समिती सचिव अरविंद मंंगळे, उपाध्यक्ष एस.के. चितालिया उपस्थित होते. प्रवेश प्रक्रियेची तारीख निश्चित करण्यासाठी बुधवारी चर्चा झाली.