अंजनगाव बारी पीएचसीला केंद्रीय पथकाची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:12 IST2021-04-11T04:12:41+5:302021-04-11T04:12:41+5:30
जिल्हाधिकारी : कोरोना त्रिसूत्रीच्या अंमलबजावणीचे निर्देश अंजनगाव बारी : दिल्ली येथून आलेल्या केंद्रीय पथकाने अंजनगाव बारी प्राथमिक आरोग्य केंद्राने ...

अंजनगाव बारी पीएचसीला केंद्रीय पथकाची भेट
जिल्हाधिकारी : कोरोना त्रिसूत्रीच्या अंमलबजावणीचे निर्देश
अंजनगाव बारी : दिल्ली येथून आलेल्या केंद्रीय पथकाने अंजनगाव बारी प्राथमिक आरोग्य केंद्राने ९ एप्रिल रोजी भेट दिली. डॉ. रॉय व डॉ. अरोरा यांच्यासमवेत जिल्ह्याधिकारी शैलेश नवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामुसंदर निकम, उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, गटविकास अधिकारी देशमुख, तहसीलदार काकडे हजर होते. केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी रजिस्ट्रेशन, व्हेरिफिकेशन, लसीकरण कक्षाची पाहणी केली.
२२३७ लाभार्थींचे १६ जानेवारी ते ८ एप्रिलपर्यंत एकूण २७ सत्रामध्ये कोरोना लसीकरण करण्यात आले. त्यात आरोग्य कर्मचारी, आशा, अंगणवाडी व ४५ वर्षावरील लोकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. रिंकुजय केचे यांनी दिली. यादरम्यान केंद्रीय पथकातील डॉक्टरांनी तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी लसीकरण केंद्र व तेथील व्यवस्थेची पाहणी केली. लसीकरण मोहीम यशस्वी करण्याच्या सूचना पथकातील अधिकाऱ्यांनी दिल्या.