जरूड ग्रामपंचायतीच्यावतीने शतकपूर्ती सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:12 IST2021-07-28T04:12:52+5:302021-07-28T04:12:52+5:30
साईबाबा मंदिर ट्रस्ट, ग्रामस्थांचा सहभाग, पहिल्यांदाच आयोजन जरूड : स्थानिक ग्रामपंचयत व साईबाबा मंदिर ट्रस्टच्यावतीने गावातील १०० वर्षे पूर्ण ...

जरूड ग्रामपंचायतीच्यावतीने शतकपूर्ती सोहळा
साईबाबा मंदिर ट्रस्ट, ग्रामस्थांचा सहभाग, पहिल्यांदाच आयोजन
जरूड : स्थानिक ग्रामपंचयत व साईबाबा मंदिर ट्रस्टच्यावतीने गावातील १०० वर्षे पूर्ण झालेले ग्रामस्थ अजाबराव देशमुख (पाटील) यांच्या शतकपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनामुळे भरग्रस्त झालेल्या नागरिकांमध्ये स्फूर्ती जागविण्यासाठी हा उपक्रम गावात पहिल्यांदाच राबविण्यात आला. ग्रामस्थांनी यामध्ये भरभरून सहभाग दिला.
अजाबराव देशमुख यांचा साई मंदिराचे विश्वस्त भीमराव वाडोदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सरपंच सुधाकर मानकर यांनी ग्रामपंचयतीचे वतीने शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी उत्क्रांती समूहाचे सचिव रामचंद्र पाटील यांनी अजाबराव देशमुख यांच्या जीवनकार्याचा आढावा मनोगतातून घेतला. यावेळी डेबूजी पतसंस्थेचे अध्यक्ष रवींद्र सुरजुसे यांनी सत्कार हा आई वडिलांनी दिलेल्या संस्कारांची पावती असल्याचे मत व्यक्त केले.
याप्रसंगी प्रथम महिला भगिनी भजन मंडळाचे काल्याचे कीर्तन झाले. नंतर राधेश्याम महाराजांच्या नेतृत्वात दिंडी काढण्यात आली. त्याला अभिनव ग्रुपच्या युवा सदस्यांनी सहकार्य केले, याप्रसंगी रामकृष्ण मेश्राम, साहेबराव उंबरकर, अविनाश देशमुख, उल्हास तडस, राजीव वडोदे, प्रवीण वाडोदे, विष्णू राऊत, साई मंदिर समितीच्या अध्यक्ष शीला पाटील, शांता वसुले, आशा पाटील, झामडे, शांता थेट्टे, किरण वाडोदे आदी महिला उपस्थित होत्या.