जिल्हा क्रीडा संकुलावर स्मशानशांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:25 IST2021-02-21T04:25:10+5:302021-02-21T04:25:10+5:30

फोटो जे-२०- स्पोर्ट ग्राऊंड अमरावती : कोरोनाचा वाढता प्रसार थांबविण्याकरिता शासनाने दर आठवड्यात शनिवार, रविवारी संचारबंदी घोषित केली आहे. ...

Cemetery silence at the district sports complex | जिल्हा क्रीडा संकुलावर स्मशानशांतता

जिल्हा क्रीडा संकुलावर स्मशानशांतता

फोटो जे-२०- स्पोर्ट ग्राऊंड

अमरावती : कोरोनाचा वाढता प्रसार थांबविण्याकरिता शासनाने दर आठवड्यात शनिवार, रविवारी संचारबंदी घोषित केली आहे. त्याची अंमलबजावणी न केल्यास दंडात्मक कारवाईची तरतूद केल्याने सुटीचे दिवस असतानाही जिल्हा क्रीडा संकुलावर स्मशानशांतता दिसून आली.

कोरोना विषाणूचा नवा ट्रेन आल्याचे वृत्त ‘लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले नि पालकांनी आपल्या पाल्यांना मैदानावर खेळायला जाण्यास मज्जावच केला. दर शनिवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ८ वाजतापर्यंत ही संचारबंदी राहणार असताना मुलांनी शनिवारी सकाळपासूनच मैदानावर येण्याचे टाळल्याचे दिसून आले. त्यावरून पालकांच्या मनात कोरोनाच्या नव्या ट्रेनबाबतची भीती लक्षात घेण्याजोगी आहे. १ फेब्रुवारीपासून कोरोनाग्रस्तांची संख्या दररोज वाढतीवरच असल्याने कधी नव्हे तो आकडा रोज ऐकिवात येत असल्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांच्या नजरा कोरोनाच्या बातम्यांवर खिळल्या आहेत. तसेच तरुणाई सकाळीच ऑनलाईन ई-पेपरवरून कोरोनाचा काॅलम बघून रोजची अपडेट जाणून घेताना दिसत आहे.

---------

Web Title: Cemetery silence at the district sports complex