सेल अॅड्सकडे ३० लाख रूपये थकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 23:33 IST2017-10-30T23:31:53+5:302017-10-30T23:33:04+5:30
सेल अॅड्स या अभिकर्त्याकडे तब्बल ३० लाख रूपये थकीत असल्याची बाब उघड झाली आहे.

सेल अॅड्सकडे ३० लाख रूपये थकीत
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सेल अॅड्स या अभिकर्त्याकडे तब्बल ३० लाख रूपये थकीत असल्याची बाब उघड झाली आहे. यात व्याजाच्या रकमेसह मागील तीन महिन्यांच्या रॉयल्टीचा समावेश आहे. सेल अॅड्स करारनाम्यातील अनेक अटी, शर्तींचा भंग करीत असताना त्यांच्यावरील मेहेरनजर मेहेरनजर राखणारे कनिष्ठ लिपिक आनंद काशीकर आणि उपायुक्त संशयाच्या भोवºयात अडकले आहेत.
उपायुक्त नरेंद्र वानखडेंनीच नव्हे, तर तत्कालीन उपायुक्तांनी सुध्दा सेल अॅड्सला अभय दिल्याचे वास्तव आहे. बड्या अधिकाºयांच्या होकाराशिवाय एखादा लिपिक सेल अॅड्सला १० वर्षे मुदतवाढीचा प्रस्ताव देऊच शकत नाही, असा दावा आता होत असून आयुक्तांना अपेक्षित सुधारणांना बगल देऊन बाजार व परवाना विभागाचा लिपिक तब्बल पाच महिने फाईल दडवून ठेवतो, यात सेल अॅड्सच्या बिदागीचे लाभार्थी कोण? याचे उत्तर दडले आहे.
महिन्याकाठी सुमारे ७.२५ लाख रूपये महापालिकेला देय असलेल्या सेल अॅड्सनी १ फेब्रुवारी २०१३ ते १० जुलै २०१५ या कालावधीतील रक्कम कधीही वेळेवर दिली नाही. दर ३० दिवसांनी ७.२५ लाख रूपये महापालिकेला देणे अपेक्षित असताना सेल अॅड्सने कमीतकमी ३६ व जास्तीत जास्त १९३ दिवसांपर्यंत रक्कम अदा केली नाही. त्यामुळे महापालिकेने सेल अॅड्सवर १८ टक्के व्याजाची आकारणी केली. १० जुलै २०१५ पर्यंत व्याजाची ही रक्कम १० लाख ६४ हजार २०४ रूपये झाली. माहितीनुसार त्यापैकी १,६३,१२५ रुपयांचा सेल अॅड्सनी भरणा केला. मात्र दोन वर्षांनंतरही बाजार परवाना या अभिकर्त्याकडून व्याजाची रक्कम वसूल करू शकला नाही. त्याआधारे सेल अॅड्सशी बाजार परवाना विभागाशी जुळलेले आर्थिक स्रेहबंध उघड झाले आहेत.
जीएसटीचा तिढा
करारनाम्यानुसार सेल अॅड्सने महिन्याकाठी ७.२५ लाख रूपये महापालिकेला द्यायला हवे. मात्र व्याजाच्या रकमेसह सेल अॅड्सने जुलै, आॅगस्ट, सप्टेंबरची मासिक रॉयल्टी दिली नसल्याची माहिती कनिष्ठ लिपिक काशीकर यांनी दिली. जीएसटीमुळे हा तिढा निर्माण झाल्याची माहिती त्यांनी पुरविली.