आकर्षक मिरवणुकीने संत गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सवाचा समारोप...
By Admin | Updated: December 22, 2016 00:37 IST2016-12-22T00:37:02+5:302016-12-22T00:37:02+5:30
संत गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सवाचा समारोप बुधवारी थाटात करण्यात आला.

आकर्षक मिरवणुकीने संत गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सवाचा समारोप...
आकर्षक मिरवणुकीने संत गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सवाचा समारोप...संत गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सवाचा समारोप बुधवारी थाटात करण्यात आला. यानिमित्ताने संत गाडगेबाबांच्या प्रतिमेची मिरवणूक सकाळी समाधी मंदिरातून काढण्यात आली. राठीनगर, संजीवनी कॉलनी, राधानगर, गाडगेबाबानगर आदी मार्गाने मार्गक्रमण केल्यानंतर मिरवणुकीचे समाधी मंदिरातच विसर्जन करण्यात आले. यामध्ये स्थानिक महेंद्र कॉलनीतील श्रीसंत गाडगेबाबा माध्यमिक विद्यामंदिरातील विद्यार्थिनी अशा आकर्षक व पारंपरिक वेशभूषेसह सहभागी झाल्या होत्या. विद्यार्थ्यांनी आकर्षक नृत्याविष्कार सादर केलेत. संत गाडगेबाबांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्याने हाती खराटा घेऊन स्वच्छतेचा संदेश दिला. मिरवणूक बघण्याकरिता नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती.