गोठ्याला आग, गाय वासरू गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:14 IST2021-03-05T04:14:15+5:302021-03-05T04:14:15+5:30

नांदगाव पेठ : स्थानिक नवीन संगमेश्वर नगरातील एका गोठ्याला मंगळवारी पहाटे अज्ञाताने लावलेल्या आगीत गोठा जळून खाक झाला. यात ...

Cattle fire, cow calf serious | गोठ्याला आग, गाय वासरू गंभीर

गोठ्याला आग, गाय वासरू गंभीर

नांदगाव पेठ : स्थानिक नवीन संगमेश्वर नगरातील एका गोठ्याला मंगळवारी पहाटे अज्ञाताने लावलेल्या आगीत गोठा जळून खाक झाला. यात गाय आणि वासरू गंभीररीत्या भाजले. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली.

बबनराव मारोतराव साकोरे यांच्या मालकीचा संगमेश्वरनगर येथे गोठा आहे. गोठ्यात शेती अवजार तसेच जनावरांसाठी चारा ठेवण्यात आला होता. गाय, वासरू बांधून व त्यांचा चारा-पाणी करून साकोरे रात्री घरी गेले. मात्र, पहाटे ५ वाजता दरम्यान गोठ्यातून धूर येत असल्याने नागरिकांनी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान खुंटीला बांधलेल्या गाय व वासरावर आगीने झडप घातली. नागरिकांनी तातडीने गाय आणि वासरू सोडविले. त्यात गाय ८० टक्के भाजली असून, वासरूदेखील गंभीर जखमी झाला आहे. जखमी गाय आणि वासरू यांना कठोरा येथील गोरक्षणमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. राजकीय वैमनस्यातून ही आग लावल्याचे बोलले जात आहे. नांदगाव पेठ पोलिसांनी नोंद घेऊन पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कुरळकर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

--------------------------------.

Web Title: Cattle fire, cow calf serious