शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

मांजाने चिमुकलीचा गळा पित्याचा हात चिरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 5:00 AM

अचानक रस्त्यातच मांजाने चिमुकलीचा गळा, तर पित्याचा दंड कापला गेला. ही धक्कादायक घटना रविवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास वडाळीजवळील सुपर हायवेवर घडली. कोमल उल्हास पांडे (७) असे चिमुकलीचे, तर उल्हास महादेव पांडे (३७, रा. पिंपळगाव चांभारे, जि. अकोला) जखमीचे नाव आहे. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ठळक मुद्देवाचला जीव : वडाळीलगत सुपर हायवेवरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दोन मुलींसह पत्नीला घेऊन दुचाकीने जात असताना अचानक रस्त्यातच मांजाने चिमुकलीचा गळा, तर पित्याचा दंड कापला गेला. ही धक्कादायक घटना रविवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास वडाळीजवळील सुपर हायवेवर घडली. कोमल उल्हास पांडे (७) असे चिमुकलीचे, तर उल्हास महादेव पांडे (३७, रा. पिंपळगाव चांभारे, जि. अकोला) जखमीचे नाव आहे. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.उल्हास पांडे हे पत्नी शालू, मुली वेदिका व कोमल यांना घेऊन शनिवारी वºहा-कुºहाजवळील घोटा गावी सासरी गेले होते. तेथून पांडे कुटुंबीय रविवारी सकाळी दुचाकीने अकोल्याकडे निघाले होते. कोमल पुढे, तर वेदिका व शालू या मागे बसल्या होत्या. दुचाकी वडाळीच्या सुपर हायवेवरून बडनेराच्या दिशेने भरधाव जात असताना अचानक कोमलच्या गळ्यात पतंगाचा मांजा येऊन अडकला आणि तिचा गळा कापला गेला. उल्हास पांडे यांनी तात्काळ बेक्र मारून दुचाकी थांबविली. त्यात हे कुटुंबीय खाली कोसळले. मांजाने शर्ट कापून उजव्या हाताच्या दंडालाही चिरल्याचे दिसून आले.दरम्यान, उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदतीचा हात देऊन जिल्हा या कुटुंबाला सामान्य रुग्णालयात आणले. सुदैवाने कोमलच्या गळ्यातील आतील नसांना इजा झाली नव्हती; मात्र गळ्याची त्वचा गंभीररीत्या कापली गेल्याचे निदर्शनास आल्याने डॉक्टरांनी कोमल व उल्हास यांच्यावर तात्काळ औषधोपचार सुरू केला. कोमलला वॉर्डात हलविण्यात आले आहे. या घटनेच्या माहितीवरून फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राजेश भगत यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन जखमींचे बयाण नोंदविले.दुचाकी थांबल्यानेजीवितहानी टळलीउल्हास पांडे यांचे दुचाकी चालविण्याकडे लक्ष होते. यादरम्यान मांजा मुलीच्या गळ्याला लागल्याचे निदर्शनास येताच, त्यांनी प्रसंगावधान राखून तात्काळ बे्रक लावले. त्यामुळे दुचाकी थांबली. भरधाव दुचाकी थोडी जरी पुढे गेली असती, तर मुलीला जिवाशी मुकण्याची स्थिती उत्पन्न झाली असती.नायलॉन मांजावरील बंदी नावापुरतीचशासनाने नायलॉन मांजाच्या वापरावर व उत्पादनावर बंदी घातलेली आहे. तरीसुद्धा अमरावती शहरात नॉयलॉन मांजाचा सर्रास वापर सुरू आहे. उल्हास पांडे यांच्यासह त्यांच्या सात वर्षीय मुलीचा अनुक्रमे हात व गळा कापण्यास नॉयलॉन मांजा कारणीभूत ठरला आहे. नायलॉन मांजाबंदीच्या काटेकोर अंमलबजावणीकडे कुठलीही यंत्रणा गंभीर नाही. एखाद्याचा जीव जाण्याजोगा प्रसंग घडूनही अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष कायम आहे.

टॅग्स :kiteपतंग