जिल्ह्यातील कॅशलेस व्यवहार ११ टक्क्यांवर
By Admin | Updated: December 25, 2016 00:10 IST2016-12-25T00:10:40+5:302016-12-25T00:10:40+5:30
पाचशे व हजारांच्या जुना नोटा चलनातून बाद केल्यानंतर कॅशलेस व्यवहारात नागरिकांनी पुढाकार घेण्यास सुरुवात केली.

जिल्ह्यातील कॅशलेस व्यवहार ११ टक्क्यांवर
पुढाकार : क्रेडिट कार्ड, धनादेश, स्वॅपचा वापर
अमरावती : पाचशे व हजारांच्या जुना नोटा चलनातून बाद केल्यानंतर कॅशलेस व्यवहारात नागरिकांनी पुढाकार घेण्यास सुरुवात केली. यामध्ये अमरावतीकरसुद्धा मागे नसून पूर्वीचा २ ते ३ टक्के कॅशलेस व्यवहार आता ११ टक्क्यांवर पोहोचला आहे. अमरावतीकरांना क्रेडिट कार्ड, धनादेश व स्वॅप मशिनद्वारे आर्थिक व्यवहार वाढविले जात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी पाचशे व हजारांच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर देशभरातील नागरिकांची ताराबंळ उडाली होती. नव्या पाचशे व दोन हजारांच्या नोटा चलनात आणल्यानंतर हळूहळू सर्वांचेच आर्थिक व्यवहार सुरळीत झाले. बँका व एटीएम समोरील रांगामुळे नागरिकांना नाहक त्रास करावा लागला. मात्र, मात्र मोदी सरकारच्या या निर्णयाचे बहुतांश नागरिकांनी स्वागतच केले. आता कॅशलेस व्यवहाराकडे नागरिकांनी आगेकुच केली आहे. त्यात अमरावतीकरांनीही पुढाकार घेतला.