कॅशियरने केली ६१ लाखांची अफरातफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 22:08 IST2019-02-06T22:08:16+5:302019-02-06T22:08:37+5:30
शोरूममधील आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या कॅशियरनेच ६१ लाख ४७ हजार ४० रुपयाने फसवणूक केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. अमित दामोधर भोसले (३८, रा. हमालपुरा) असे अटक आरोपीचे नाव असून, त्याला दोन दि२वसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

कॅशियरने केली ६१ लाखांची अफरातफर
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शोरूममधील आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या कॅशियरनेच ६१ लाख ४७ हजार ४० रुपयाने फसवणूक केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. अमित दामोधर भोसले (३८, रा. हमालपुरा) असे अटक आरोपीचे नाव असून, त्याला दोन दि२वसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सातुर्णा स्थित अस्पा बंड सन्स या कार शोरूमचे संचालक सत्यजित विजय बंड (५०, रा. जोशीवाडी) यांनी मंगळवारी रात्री राजापेठ पोलिसांत तक्रार नोंदविली. अमित हा दीड वर्षांपासून कॅशियर पदावर कार्यरत होता. ग्राहकांकडून मिळालेल्या रकमांच्या नोंदी, बँक रजिस्टरच्या नोंंदी, सेल्स कॅश बूक, बँक कॅशबूक अशा सर्व नोंदींची जबाबदारी अमित भोसलेकडे होती. अमितने कॅशबूक व अन्य रजिस्टरमध्ये खोट्या नोंदी घेऊन ग्राहकांकडील रकमेचे गबन केल्याचे शोरूमच्या आर्थिक आॅडीटवरून निदर्शनास आले. अमितने अशाप्रकारे ६१ लाख ४७ हजार ४० रुपयांची अफरातफर केल्याचे शोरूम संचालक सत्यजित बंड यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे अमितने केलेल्या अफरातफर व फसवणुकीची तक्रार त्यांनी राजापेठ पोलिसांत नोंदविली आहे. या घटनेचा प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक गोकुल ठाकूर यांनी केला असून, आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ४०६, ४०८, ४२० अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक गजानन मेहेत्रे पुढील तपास करीत आहेत.
कॅशियरने आर्थिक व्यवहारांच्या चुकीच्या नोंदी घेऊन फसवणूक केल्याची तक्रार प्राप्त झाली. त्यानुसार तात्काळ आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे.
- किशोर सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक, राजापेठ ठाणे.