काऊंटरमधील रोख चोरणारे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 23:32 IST2018-10-23T23:32:15+5:302018-10-23T23:32:31+5:30
बडनेरा येथील कृषी सेवा केंद्राच्या काऊन्टरमधून रोख चोरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी अटक केली. कपिल रमेश भाटी (२१), आशुतोष ऊर्फ आशू लखनलाल पातालवंशी (१९, दोन्ही रा. बेलपुरा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

काऊंटरमधील रोख चोरणारे गजाआड
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बडनेरा येथील कृषी सेवा केंद्राच्या काऊन्टरमधून रोख चोरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी अटक केली. कपिल रमेश भाटी (२१), आशुतोष ऊर्फ आशू लखनलाल पातालवंशी (१९, दोन्ही रा. बेलपुरा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
बडनेरा येथील आठवडी बाजारात रोशन गजानन पोहणे यांचे केएसके सप्लायर्स नावाचे कृषी सेवा केंद्र आहे. २० आॅक्टोबर रोजी पोहणे यांच्या कृषी केंद्रात दोन अज्ञात व्यक्ती आले. त्यांनी थ्रिनेटची मागणी केली. दरम्यान पोहणे दुकानाच्या आत गेले असता, अज्ञातांनी काउंटरच्या गल्ल्यातील २५ हजार ९०० रुपये लंपास केले. याप्रकरणात बडनेरा पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध भादंविच्या कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. घटनेच्या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास सुरू करून कपिल भाटी व आशुतोषची बारकाईने चौकशी केली. त्यावेळी आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघांनाही अटक करून त्यांच्याजवळील १७ हजार रुपये रोख व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली. ही कारवाई पोलीस आयुक्त संजयकुमार बावीस्कर, पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक आशिष देशमुख, पोलीस शिपाई राजेश पाटील, राजू आप्पा बाहेनकर, सैय्यद इमरान, दिनेश नांदे, इजाज शाह, निवृत्ती काकडे, चालक गजानन सातंगे यांच्या पथकाने केली आहे.
कपिल भाटी सराईत गुन्हेगार
आरोपी कपिल भाटी हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध राजापेठ व फे्रजरपुरा ठाण्यात दोन चोरीच्या गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे. अमरावती ग्रामीण हद्दीतील चांदूररेल्वे हद्दीत एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.