बडनेऱ्यात तरुणाच्या खून प्रकरणी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:13 IST2021-05-20T04:13:23+5:302021-05-20T04:13:23+5:30
अर्जुन माधवसिंग वर्मा (२५, रा. इंदिरानगर) असे मृतकाचे नाव आहे या घटनेतील आरोपी शेखर चिंचोळकर(३०, रा.) इंदिरा नगर जुनीवस्ती ...

बडनेऱ्यात तरुणाच्या खून प्रकरणी गुन्हा दाखल
अर्जुन माधवसिंग वर्मा (२५, रा. इंदिरानगर) असे मृतकाचे नाव आहे या घटनेतील आरोपी शेखर चिंचोळकर(३०, रा.) इंदिरा नगर जुनीवस्ती याने मृतकास लोखंडी पाईपने मारहाण केल्याचे फिर्यादी रेखा माधव सिंग वर्मा यांनी पोलिसांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तब्बल दोन महिन्यापूर्वी सदरची मारहाण झाली होती जखमी अवस्थेत अर्जुनला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते त्यानंतर त्याला नागपूरला हलविण्यात आले तेथे १३ मार्च रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला त्यानंतर १८ मे रोजी तक्रार दाखल करण्यात आली बडनेरा पोलिसांनी भादवि ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज कांबळे व उपनिरीक्षक उमेश मारोडकर करीत आहे फिर्यादी दुःखात असल्याने घटनेची तक्रार उशिराने दाखल झाल्याचे नमूद आहे अद्याप आरोपी फरार आहे पोलिस त्याचा शोध घेत आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.