कार, ट्रक, दुचाकी पुलाखाली कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 22:29 IST2018-03-05T22:29:19+5:302018-03-05T22:29:19+5:30
तालुक्यातील सेमाडोह ते पिली दरम्यान मोती नाल्याच्या पुलाखाली कार, कापूस घेऊन जाणारा ट्रक आणि दुचाकी कोसळली. विचित्र अपघाताचे हे सत्र रविवारी रात्रीपासून सुरू आहे यात ट्रकमधील एक ठार, तर दुसरा जखमी असल्याची माहिती आहे.

कार, ट्रक, दुचाकी पुलाखाली कोसळले
आॅनलाईन लोकमत
चिखलदरा : तालुक्यातील सेमाडोह ते पिली दरम्यान मोती नाल्याच्या पुलाखाली कार, कापूस घेऊन जाणारा ट्रक आणि दुचाकी कोसळली. विचित्र अपघाताचे हे सत्र रविवारी रात्रीपासून सुरू आहे यात ट्रकमधील एक ठार, तर दुसरा जखमी असल्याची माहिती आहे.
जगदीश रघुवंशी (४५,रा. इंदूर) असे मृत ट्रकचालकाचे नाव आहे. त्याचा भाऊ यात किरकोळ जखमी झाला. कापूस घेऊन जात असलेला ट्रक सोमवारी सकाळी ११ वाजता मोतीनाला पुलाखाली कोसळला. यात गंभीर जखमी जगदीशला उपचारार्थ सेमाडोह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिकेने उपचारासाठी पाठविले असता, त्याचा मृत्यू झाला. मोती नाल्यावर रविवारी रात्री पांढºया रंगाची कार कोसळली. काही अंतराने दुचाकी बाजूला कोसळली. यात सुदैवाने कुणालाच इजा झाली नाही, या विचित्र अपघाताची चर्चा मेळघाटात होती. चिखलदरा पोलीस तपास करीत आहे.