विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी मोहीम ग्रामीण भागातही राबवा...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:13 IST2021-04-22T04:13:15+5:302021-04-22T04:13:15+5:30
अमरावती : शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर शासन, प्रशासनाने खबरदारीचा उपाययोजना म्हणूनही लॉकडाऊन ...

विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी मोहीम ग्रामीण भागातही राबवा...!
अमरावती : शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर शासन, प्रशासनाने खबरदारीचा उपाययोजना म्हणूनही लॉकडाऊन जारी केले. मात्र, काही अतिउत्साही मंडळी ग्रामीण भागात विनाकारण फिरत असून, त्यांची थेट रस्त्यावरच कोरोना चाचणी करून बाधितांना थेट कोरोना रुग्णालयात दाखल केले जात आहे. शहरातील या मोहिमेची सर्वत्र चर्चा व विनाकारण फिरणाऱ्यांनी चांगलाच धसका घेतला आहे. त्यामुळे हॉटस्पॉट ठरलेल्या गावातही हा उपक्रम राबविल्यास विनाकारण फिरणाऱ्यांवर जरब बसून वाढलेलेला कोरोनाचा प्रसार आटोक्यात येण्यास मदत होऊ शकते, अशा सार्वत्रिक प्रतिक्रिया उमटत आहेत.
कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाउन संचारबंदी जमाबंदी अथवा खबरदारी उपायोजना याबाबत प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. तरीही काही अतिउत्साही मंडळींवर त्याचा परिणाम होत नाही .अशा अतिउत्साही मंडळींचा ठिकाणावर आणण्यासाठी आता ग्रामीण भागातही महापालिकेने सुरू केलेल्या रस्त्यावरील कोरोना चाचणीचा उपक्रम ग्रामीण भागातही राबविल्यास कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यास मोठी मदत होऊ शकते, अशी चर्चा ठिकठिकाणी रंगत आहे. महापालिका क्षेत्रात याचा प्रसार वाढत चालल्याने थेट रस्त्यावरच रुग्णवाहिका लावून संबंधितांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. यात बाधित आल्यास त्याची थेट कोरोना हॉस्पिटल अथवा केअर सेंटरमध्ये रवानगी करण्यात येत आहे. हीच मोहीम आता ग्रामीण भागात सर्वत्र प्रभावीपणे राबविल्यास नक्कीच कोरोना नियंत्रणासाठी मदत होऊ शकतो, त्यामुळे प्रशासन यासाठी पुढाकार घेणार का, हा खरा प्रश्न आहे.
बॉक्स
सर्वच तालुक्यात रुग्ण
गत काही दिवसांपासून शहरापेक्षा ग्रामीण भागातील १४ तालुक्यांत कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होण्यापेक्षा वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आता खऱ्या अर्थाने कोरोना नियंत्रणासाठी प्रभावीपणे व सक्तीने कठोर पावले उचलण्याची गरज आहे. त्याशिवाय ग्रामीण भागात फोफावलेला कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येणे अशक्य आहे.