लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : भरधाव मालवाहू वाहन उभ्या ट्रकवर आदळल्याने झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले. शुक्रवारी पहाटे ४ च्या सुमारास हा अपघात घडला. संजय केशवराव माकोडे आणि कमलेश गलफट (रा. वरूड) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. एमएच ०४ एफडी ९९८४ क्रमांकाचे मालवाहू वाहन शुक्रवारी पहाटे ५ च्या सुमारास अमरावतीवरून भाजीपाला घेऊन वरूडकडे येत होते. जरूड ते वरूड रस्त्यावर सीजी ०७ सीए ८५६५ हा मालवाहू ट्रक हवा भरण्याकरिता उभा होता. भरधाव मालवाहू वाहन त्याला मागच्या बाजूने धडकले. मालवाहू वाहनाचा चालक व वाहक केबिनमध्ये अडकले. ट्रकचालकाने नागरिकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढले. त्याच वाहनातील मागे बसलेले दोघेदेखील किरकोळ जखमी झाले. वरूडचे ठाणेदार मगन मेहते, जरूड बीटचे जमादार अशोक संभे, मनोज कळसकर, सुनील अकोलेकर यांनी घटनास्थळ गाठून सर्व जखमींना वरूड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ट्रकचालक मो. वलीम मो. वकील (३२, रा. आधारताल, जबलपूर) याच्या तक्रारीवरून वाहनचालकाविरुद्ध भादंविचे कलम २७९, ३३७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
ट्रकवर मालवाहू वाहन आदळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 01:11 IST
भरधाव मालवाहू वाहन उभ्या ट्रकवर आदळल्याने झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले. शुक्रवारी पहाटे ४ च्या सुमारास हा अपघात घडला. संजय केशवराव माकोडे आणि कमलेश गलफट (रा. वरूड) अशी गंभीर जखमींची नावे आहेत.
ट्रकवर मालवाहू वाहन आदळले
ठळक मुद्देचार जखमी : वरूड येथील घटना