कार दरीत कोसळली; सहा जखमी

By Admin | Updated: October 6, 2016 00:30 IST2016-10-06T00:30:30+5:302016-10-06T00:30:30+5:30

धोतरखेडा येथून घटांग मार्गे चिखलदरा जाणाऱ्या चार चाकी वाहनावरील वळणावर नियंत्रण सुटल्याने सहा जण जखमी झाल्याची...

The car collapsed; Six injured | कार दरीत कोसळली; सहा जखमी

कार दरीत कोसळली; सहा जखमी

अपघातांची मालिका : नियंत्रण सुटल्याने झाला अपघात
परतवाडा : धोतरखेडा येथून घटांग मार्गे चिखलदरा जाणाऱ्या चार चाकी वाहनावरील वळणावर नियंत्रण सुटल्याने सहा जण जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी ६.३० वाजता घडली. देवी पॉइंटवर दर्शनासाठी जात असताना हा अपघात घडला.
नंदकिशोर वाठ, विश्वंभर भातकुले, लता ठोसर, विश्वंभर भाकुले, वंदना नंदकिशोर वाठ, विकास भातकुले व ओम ठोसर ( सर्व रा. धोतरखेडा ) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे चिखलदरा येथे नवरंग नवदुर्गाेत्सव मंडळातर्फे महापदयात्रेचे आयोजन करण्यात येते. हजारो भक्त त्यामध्ये सहभागी होतात. धोतरखेडा येथील वाठ कुटूंब आपल्या होंडा सिटी एमएच २७ बीई २७०१ क्रमांकाच्या वाहनाने परतवाडा-घटांगमार्गे चिखलदरा येथे देवी पॉइंटवर दर्शनासाठी जात होते. मात्र, घटांग नजिकच्या एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी २० फूट खोल दरीत गेली. त्यामध्ये सहा जण जखमी झाले. चिखलदारा मार्गावर ये-जा काही नागरिकांनी जखमींना परतवाडा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. जखमींवरउपचार सुरू आहे.

दुचाकींचा जीवघेणा प्रवास
चिखलदरा महापदयात्रेत बुधवारी मोठ्या संख्येने भक्त सहभागी झाले होते. ३२ किलोमीटर पर्यंत पायदळ प्रवास केल्यानंतर परतीच्या प्रवासात दुचाकीवर चार ते पाच जण आणि लहान मुल पेट्रोल टाकीवर बसून घाटातून भरधाव येतानाचे जीवघेणे चित्र दुपारी १.३० वाजतापासून धामणगाव गढी मार्गे चिखलदरा रस्त्यावर दिसून येत होते. सायंकाळी ६ वाजेपर्यंत दुचाकींचा भक्तांद्वारे जीवघेणा प्रवास पाहणाऱ्यांच्या शरीरालाच थरकाप सोडणारा होता.

Web Title: The car collapsed; Six injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.