एक्सप्रेस हायवेचे कठडे तोडून कार कोसळली

By Admin | Updated: September 15, 2016 00:14 IST2016-09-15T00:14:54+5:302016-09-15T00:14:54+5:30

भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने एक्सप्रेस हायवेवरील सुरक्षा कठडे तोडून कार खाली कोसळली.

The car collapsed by breaking the expressway of the expressway | एक्सप्रेस हायवेचे कठडे तोडून कार कोसळली

एक्सप्रेस हायवेचे कठडे तोडून कार कोसळली

छत्री तलावजवळील घटना : बापलेक जखमी
अमरावती : भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने एक्सप्रेस हायवेवरील सुरक्षा कठडे तोडून कार खाली कोसळली. ही घटना बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास छत्री तलाव स्थित पुलाजवळ घडली. या अपघातात कारमधील बापलेक किरकोळ जखमी झाले.
मासोद येथील रहिवासी बबन लक्ष्मण निभोंरकर (४५) व त्यांच्या मुलगा हे कारने बडनेरावरून मासोदकडे जात होते. दरम्यान छत्री तलाव स्थित एक्सप्रेस हायवेच्या पुलाजवळ त्यांचे वाहनांवरील नियंत्रण सुटून कार सुरक्षा कठडे तोडून रोडच्या खाली कोसळली. सुदैवाने कारमधील बलूनमुळे दोघेंही बापलेक बचावले. मात्र, या अपघातात दोघेही किरकोळ जखमी झालेत. दोघांनाही खासगी रुग्णालयात उपचाराकरिता नेण्यात आले. घटनेची माहिती मिळताच फे्रजरपुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणात कारवाईची प्रक्रिया सुरु होती. (प्रतिनिधी)

Web Title: The car collapsed by breaking the expressway of the expressway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.