बोराळानजीक कार पुलाखाली कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 00:13 IST2018-05-01T00:13:28+5:302018-05-01T00:13:49+5:30
परसापूर ते टेब्रुसोंडा मार्गावरील बोराळानजीक रविवारी मध्यरात्री भरधाव कार पुलाखाली कोसळली.

बोराळानजीक कार पुलाखाली कोसळली
ठळक मुद्देबोराळानजीक घटना : उपसरपंचाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : परसापूर ते टेब्रुसोंडा मार्गावरील बोराळानजीक रविवारी मध्यरात्री भरधाव कार पुलाखाली कोसळली. या अपघातात अचलपूर तालुक्यातील कोठारा येथील उपसरपंचाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
दीपक गुलाबराव कुबडे (२८) असे मृताचे नाव आहे. कोठारा गावानजीक बहिरम मार्गावर त्यांचा ढाबा आहे. रविवारी रात्री ते एका लग्नात सहभागी होते. त्यानंतर ते स्वत:च्या एमएच १३ ई १८३६ क्रमांकाच्या कारने परसापूर-टेम्ब्रुसोंडा मार्गावरून जात असताना, बोराळानजीक भरधाव कार पुलाखाली कोसळली. त्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पथ्रोट पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असल्याचे ठाणेदार नितीन आडे यांनी सांगितले.