साडेतीन वर्षांची ओजस्वी सांगतेय जगातील प्रत्येक राज्याची राजधानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:09 IST2021-07-09T04:09:54+5:302021-07-09T04:09:54+5:30
जगाच्या नकाशावरआता मंगरूळ चे नाव ,फोटो पी ०८ फोटो पी ०८ ओजस्वी मोहन राऊत/ धामणगाव रेल्वे तिचे वय अवघे ...

साडेतीन वर्षांची ओजस्वी सांगतेय जगातील प्रत्येक राज्याची राजधानी
जगाच्या नकाशावरआता मंगरूळ चे नाव
,फोटो पी ०८
फोटो पी ०८ ओजस्वी
मोहन राऊत/ धामणगाव रेल्वे
तिचे वय अवघे साडेतीन वर्ष. मात्र जगातील कोणत्याही राज्याची राजधानी असो अथवा केंद्रशासित प्रदेशाची राजधानी असो अवघ्या एका सेकंदात ती योग्य उत्तर देते. त्यामुळे इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये तिच्या नावाची नोंद झाली आहे. तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर तिच्या मूळ गावी विजयाची पताका जगाच्या नकाशावर फडकत असताना पहायला मिळत आहे.
धामणगाव तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर येथील अजय देशमुख यांचा मुलगा अनिरुद्ध हे नाशिकमध्ये स्थायिक झाले. त्यांची साडेतीन वर्षांची ओजस्वी हिने इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आपल्या नावाची नोंद केली आहे. अनिरुद्ध हे डेहराडून येथे इस्रोमध्ये वैज्ञानिक आहे, तर आई प्रगती एम.एस्सी झाल्या असून गृहिणी आहेत. त्यांची एकुलती एक मुलगी ओजस्वीला कळायला लागले तेव्हापासून तिने खेळण्या सोबतच जिल्हा, राज्याचे नकाशे चाळण्यास सुरुवात केली. सर्वात प्रथम आपण ज्या महाराष्ट्रात राहतो, त्याची राजधानी कोणती तद्नंतर भारतातील प्रत्येक राज्याची राजधानी तसेच केंद्रशासित प्रदेशाची राजधानी ती अवघ्या एक-दोन सेकंदात सांगते. जगातील कोणत्याही देशातील एखाद्या राज्याची राजधानी विचारल्यास ती क्षणाचाही विलंब न लावता स्पष्ट सांगते, हे कौतुकास्पद आहे.
आम्ही मंगरूळ दस्तगीर येथील रहिवासी असून, माझी साडेतीन वर्षांची मुलगी ओजस्वी ही लहानपणापासून नकाशा चाळत होती. तिच्या आईच्या मार्गदर्शनात ती आज अवघ्या जगातील देशाच्या राजधानी सांगू शकते.
- अनिरुद्ध देशमुख,
वडील