बेडवरुन उठता येत नाही, घरीयेवून दिली जानार लस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:12 IST2021-07-27T04:12:56+5:302021-07-27T04:12:56+5:30

अमरावती : आजारांमुळे अंथरुणावर असलेले रुग्ण, याशिवाय केंद्रांवर जाण्यास असमर्थ असलेल्या व्यक्तींना आता घरपोच लस मिळणार आहे. राज्याच्या आरोग्य ...

Can't get out of bed, will be vaccinated at home! | बेडवरुन उठता येत नाही, घरीयेवून दिली जानार लस!

बेडवरुन उठता येत नाही, घरीयेवून दिली जानार लस!

अमरावती : आजारांमुळे अंथरुणावर असलेले रुग्ण, याशिवाय केंद्रांवर जाण्यास असमर्थ असलेल्या व्यक्तींना आता घरपोच लस मिळणार आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने तसा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातदेखील अशा व्यक्तींना लस देण्यात येणार असल्याची माहिती लसीकरणाचे जिल्हा समन्वयकांनी दिली.

यासंदर्भात शासननिर्देश प्राप्त होताच अशा रुग्णांची माहिती संकलित केल्या जाणार आहे. याशिवाय रुग्णांच्या नातेवाइकांद्वारा संबंधित कागदपत्रांची पडताळणी करून त्यांना घरपोच लस देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये लसीकरण प्रभावी उपाययोजना आहे. याद्वारे सामूहिक रोगप्रतिकारशक्ती तयार झाल्यास कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात झाली. सर्वप्रथम हेल्थ लाईन वर्कर, त्यानंतर फ्रंट लाईन वर्कर व नंतर पुन्हा तीन टप्प्यात लसीकरण जिल्ह्यात होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७,७३,९९९ नागरिकांनी कोरोना लस घेतली आहे. यामध्ये ५,७०,८३० नागरिकांनी पहिला डोस व २,०३,१६९ व्यक्तींनी दुसरा डोस घेतलेला आहे.

आतापर्यंत ७,५५,५८० डोस जिल्ह्यास प्राप्त आहेत. यामध्ये ५,९२,३३० कोविशिल्ड तर १,६३,२५० डोस कोव्हॅक्सिनचे आहेत. मागणीच्या तुलनेत लसींचा पुरवठा होत नसल्याने जिल्ह्यातील बहुतांश लसीकरण केंद्र बंद राहत असल्याची स्थिती ओढावली आहे.

पाईंटर

जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण

पहिला डोस : ५,७०,८३०

दोन्ही डोस : २,०३,१६९

६० पेक्षा जास्त वयोगट

पहिला डोस : १,७८,७३१

दोन्ही डोस : ८७,४१४

बॉक्स

हायरिस्कमध्ये कोण?

ज्या व्यक्तींना अर्धांगवायू झालेला आहे. याशिवाय मेंदूविकार, हात, पाय लुळे पडलेले, फॅक्चर असल्याने बेडवरच असलेले, अन्य आजारावर बेडवरच असलेले रुग्ण, या सर्वांना आता घरपोच लसीकरणाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

कोट

बेडवर असलेल्या रुग्णांना घरी जाऊन लस देण्याबाबतचे आदेश येणार आहे. त्यानंतर संबंधित विभागाला याची मागविली जाईल. याव्यतिरिक्त अशा रुग्णांच्या नातेवाइकांनी कागदपत्रे दाखविल्यास पडताळणी करून त्यांना घरी लस देता येणार आहे.

डॉ. ००० करंजीकर

लसीकरण, जिल्हा समन्वयक

कोट

मला लस कधी मिळणार?

अर्धांगवायुच्या त्रासामुळे दोन वर्षांपासून बेडवरच आहे. त्यामुळे कोरोना लस मिळणार नाही अशी धारणा होती. आता शासनाचे निर्णयानंतर घरपोच लस मिळणार असल्याने आनंदाने घेऊ.

आशाबाई पाटील, धामणगाव रेल्वे

अपघातामुळे पायाचे व मणक्याचे ऑपरेशन झाले आहे. त्यामुळे चार महिन्यांपासून घरीच आहे. त्यामुळे लस घेता आलेली नाही. आता कर्मचारी घरी येणार असल्याने लस घेऊ.

सलीमभाई, अमरावती

Web Title: Can't get out of bed, will be vaccinated at home!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.