शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नरभक्षक वाघाने शेतमजुराला केले ठार,  तीन दिवसांत दुसरा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 22:26 IST

दोन दिवसांपूर्वी शेतक-याला ठार केल्यानंतर नरभक्षक वाघाने आणखी एका शेतमजुराची शिकार केली. या घटनेने धामणगाव तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. वाघाला जेरबंद करण्यात अपयश आलेल्या वनखात्याविरुद्ध मोठा रोष उफाळून आला आहे. 

 - मोहन राऊत 

अमरावती -  दोन दिवसांपूर्वी शेतक-याला ठार केल्यानंतर नरभक्षक वाघाने आणखी एका शेतमजुराची शिकार केली. या घटनेने धामणगाव तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. वाघाला जेरबंद करण्यात अपयश आलेल्या वनखात्याविरुद्ध मोठा रोष उफाळून आला आहे.  धामणगाव तालुक्यातील अंजनसिंगी येथील मोरेश्वर बाबाराव वाळके (४५) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतमजुराचे नाव आहे़ मंगरूळ दस्तगीर येथील राजेंद्र निमकर यांचा शुक्रवारी वाघाने बळी घेतल्यानंतर दुसºया दिवशी वनविभागाने बांधलेल्या जिवंत म्हशीला याच वाघाने फस्त केले. त्यानंतर शिदोडी येथील विनोद निस्ताने यांच्या घराबाहेर बांधलेल्या जर्सी कालवडीचे लचके तोडून हा नरभक्षक वाघ सोमवारी पहाटे अंजनसिंंगी किनईच्या जंगलात पसार झाला़ त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने तीन पिंजºयांत म्हशी बांधून ठेवल्या होत्या. त्याच जंगलात चारा आणण्यासाठी गेलेल्या मोरेश्वर वाळके यांचे पायच शिल्लक ठेवलेले धड व धडावेगळे शीर मंगळवारी पोलिसांना आढळून आले. वनखात्याने जेथे म्हशी बांधून ठेवल्या होत्या, त्याच्या ५० फुटांवर नरभक्षक वाघाने या शेतमजुराची शिकार केली. ----------------मृतदेह ताब्यात घेण्यास नकारनागरिक चार दिवसांपासून वाघाच्या दहशतीत जगत आहेत. वनविभागाने कोणतीच उपाययोजना केली नाही़ मुख्य वनसंरक्षकांनी घटनास्थळी भेटही दिली नाही़ वनविभागाने खबरदारी बाळगली असती, तर दुसरा जीव गेला नसता़ नरभक्षक वाघाला जेरबंद करावे. मृताच्या नातेवाइकाला तात्काळ शासकीय सेवेत सामावून घ्यावे, दहा लाखांची मदत नगदी स्वरूपात द्यावी, अशा मागण्या मृताच्या कुटुंबीयांकडून करण्यात आल्या. त्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा त्यांनी घेतला होता.   काँग्रेसचे ठिय्या आंदोलननरभक्षक वाघाच्या भीतीपोटी सर्वच कामे ठप्प असून, शेतकरी व शेतमजूर शेतात जाण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे.संबंधित वाघाला ठार मारा किंवा जेरबंद करा, या मागणीसाठी तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने ग्रामीण रुग्णालयात ठिय्या आंदोलन करण्यात  आले. नरभक्षक वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, या मागणीसाठी आ. वीरेंद्र जगताप हे मंत्रालयाशी सतत संपर्कात आहेत.  ९० वेळा नखे, पंजाचा मारावाघाने अत्यंत क्रूरतेने शिकार केली आहे. मोरेश्वर यांचे मुंडके धडावेगळे केले. त्यांच्या शरीरावर पंजा व दाताच्या ९० जखमा असल्याचा अहवाल वैद्यकीय अधिकाºयाने दिला आहे. बकºयांसाठी चारा आणण्यासाठी साडेचार वाजता मोरेश्वर जंगलात गेले होते. ते हमालीचे काम करायचे.  शाळा-महाविद्यालये बंदवाघाच्या भीतीमुळे धामणगाव व तिवसा तालुक्यांतील शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. कुºहा येथील श्रीराम महाविद्यालयात सुरू असलेला विद्यापीठाचा पेपर पुढे ढकलला आहे. अंजनसिंगी येथे तब्बल दीडशे वनकर्मचाºयांचा ताफा असून, विशेष पोलीस पथक, दंगल नियंत्रण पथक कार्यान्वित आहे़

अधिका-यांची घटनास्थळी भेटमोरेश्वर  वाळके यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने चांदूर रेल्वेच्या महसूल उपविभागीय अधिकारी स्नेहल कनिचे, पोलीस उपविभागीय अधिकारी अविनाश शिंगटे, धामणगाव रेल्वेचे तहसीलदार अभिजित नाईक, नायब तहसीलदार कृष्णा सूर्यवंशी, वनविभागाचे सहायक उपवनसंरक्षक अशोक कविटकर, वनक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांनी नातेवाइकांसह काँग्रेसच्या पदाधिकाºयांची समजूत काढली.मृतदेह ताब्यात घेण्याची विनंती केली. दुपारी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर तणाव निवळला.

टॅग्स :AmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र