प्रामाणिक कार्यकर्त्यास काँग्रेसची उमेदवारी
By Admin | Updated: October 11, 2015 01:36 IST2015-10-11T01:36:56+5:302015-10-11T01:36:56+5:30
महापालिकेच्या गवळीपुरा वॉर्ड क्र. २६ मध्ये होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीसाठी ज्या कार्यकर्त्याने मागील विधानसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केले,...

प्रामाणिक कार्यकर्त्यास काँग्रेसची उमेदवारी
पदाधिकाऱ्यांची बैठक : रावसाहेब शेखावत यांची माहिती
अमरावती : महापालिकेच्या गवळीपुरा वॉर्ड क्र. २६ मध्ये होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीसाठी ज्या कार्यकर्त्याने मागील विधानसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केले, अशाच कार्यकर्त्याला पक्षाची उमेदवारी दिली जाईल, असे माजी आमदार रावसाहेब शेखावत यांनी शनिवारी शहर काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात पार पडलेल्या पदाधिकारी व नगरसेवकांच्या बैठकीत स्पष्ट केले आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी पक्ष संघटन व इतर विषयावर माझी चर्चा झाली. पक्षाने आतापर्यंत जी विकासाचे कामे केलीत ती अखेरच्या घटकांपर्यंत सर्वांना पोहोचावावीत, असे आवाहन शेखावत यांनी केले. पक्षाचे नगरसेवकांचा जनसंपर्क, कार्य व पक्षसंघटन याचा लेखा जोखा प्रदेश काँग्रेसने मागीतला आहे. या निवडणुकीसाठी १२ आॅक्टोबरला उमेदवार घोषित होणार आहे. यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. केली आहे.
यावेळी बैठकीला शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय अकर्ते, वसंतराव साऊरकर, विलास इंगोले, बबलू शेखावत, अनिल नावंदर, राजेंद्र लुनावत, सुगमचंद गुप्ता, आसिफ तबकल, वंदना कंगाले, अर्चना सवाई, हमीद शद्दा, अक्षय भुयार , राजा बांगळे, अरूण जयस्वाल व पदाधिकारी महापालिकेचे नगरसेवक मोठया संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)