जिल्हा नियोजन समितीची रद्द बैठक पुन्हा होणार
By Admin | Updated: September 6, 2014 01:26 IST2014-09-06T01:26:48+5:302014-09-06T01:26:48+5:30
मुंबईत मागील महिन्यात २६ आॅगस्ट रोजी होणारी जिल्हा नियोजन समितीची बैठक विरोधकांच्या आक्षेपामुळे ऐनवेळी रद्द करण्याची वेळ पालकमंत्री यांच्यावर ओढावली होती.

जिल्हा नियोजन समितीची रद्द बैठक पुन्हा होणार
अमरावती : मुंबईत मागील महिन्यात २६ आॅगस्ट रोजी होणारी जिल्हा नियोजन समितीची बैठक विरोधकांच्या आक्षेपामुळे ऐनवेळी रद्द करण्याची वेळ पालकमंत्री यांच्यावर ओढावली होती. आता मात्र पुन्हा हिच बैठक रविवारी दुपारी ४ वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात बोलविण्यात आली आहे. या बैठकीत जनसुविधा योजनेच्या सुमारे ३ कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी मिळावी, यासाठी ऐन सुट्टीच्या दिवशी ही बैठक बोलाविण्यात आल्याने याविषयी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
रविवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विषय सुचीवर १३ जानेवारी रोजी पार पडलेल्या सभेतील कार्यक्रमात मंजुर करणे, याच कार्यक्रमातील अनुपालनावर चर्चा करणे जिल्हा वार्षीक योजना सन २०१३-१४ अंतर्गत माहे मार्च २०१४ अखेर झालेल्या खर्चाचा आढावा सर्वसाधारण योजना, अनुसुचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना बाह्यक्षेत्र (ओटीएसपी) सन २०१४-१५ करीता अर्थ संकल्पीय नियतव्यय व माहे जुलै २०१४ पर्यंत खर्चाचा आढावा, सर्वसाधारण योजना, अनुसुचित जाती उप योजना, आदिवासी उपयोजना, आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्र (ओटीएसपी) आणि अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या विषयावर चर्चा केली जाणार आहे. मात्र या विषयसुची वरील पहिल्या विषयात कार्यक्रम वाचून कायम केल्यास जनसुविधेच्या व इतर महत्वाच्या कामांना मंजुरी मिळू शकते. कारण जानेवारी महिण्यात नियोजन केलेले विकास कामे विधानसभेच्या निवडणुकीच्या आचार संहितेपूर्वी मार्गी लागावीत, यासाठी काही राजकीय नेते जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी पालकमंत्र्यांकडे आग्रही होते, हे विशेष.