पोटेंची जमीन खरेदी रद्द करा

By Admin | Updated: May 28, 2016 00:02 IST2016-05-28T00:02:22+5:302016-05-28T00:02:22+5:30

पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी खरेदी केलेले सर्व्हे क्रमांक ५७(१) चे ले-आऊट अवैध असल्याचा आरोप काही शेतकऱ्यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रपरिषदेत पुन्हा केला.

Cancel purchase of land in Potte | पोटेंची जमीन खरेदी रद्द करा

पोटेंची जमीन खरेदी रद्द करा

पत्रपरिषद : तक्रारकर्त्यांची मागणी
अमरावती : पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी खरेदी केलेले सर्व्हे क्रमांक ५७(१) चे ले-आऊट अवैध असल्याचा आरोप काही शेतकऱ्यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रपरिषदेत पुन्हा केला. यासंबंधाने शनिवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही या शेतकऱ्यांनी पत्रकारांना सांगितले.
पत्रपरिषदेत दिलेल्या निवेदनानुसार, तक्रारकर्त्यांनी सर्व्हे क्रमांक ५७ चे मालक अंबा ट्रेडर्स यांच्याकडून भूखंड खरेदी केले. अंबा ट्रेडर्स ही भागिदारी फर्म आहे. सत्यनारायण रामगोपाल अग्रवाल आणि राजू श्यामराव देऊळकर हे त्याचे भागिदार आहेत. भागिदारांनी तेच प्लॉट पुन्हा पोटे यांना विकले. २२ मे २०१६ रोजी काढलेल्या सर्व्हे क्रमांक ५७ च्या सातबाऱ्यात प्रवीण पोटे यांच्या नावाचा उल्लेख आहे. २८ वर्षांपूर्वी आम्ही केलेली खरेदी नियमाप्रमाणे आहे. त्यानंतरची पोटे यांची खरेदी नियमबाह्य आहे. नंतरच्या खरेदीचा फेरफार रद्द करून आमच्या खरेदीचा फेरफार करावा, अशी मागणी शांताकुमार बोबडे, भानुदास आखरे, पार्वताबाई गुप्ता, चारुशिला गुल्हाने, चिदंबरम कुट्टी, शोभा लोखंडे, अशोक गुप्ता, अरूण कुयरे, दत्ताराम गुल्हाने, शालिनी शिंदे, अरूण गुलवाडे यांनी पत्रपरिषदेत केली.
अमरावतीचे जिल्हाधिकारी, अमरावतीबाहेरील अधिकारी आणि मंत्रालयातील अधिकाऱ्यांची समिती गठित करून या प्रकरणाची सखोल चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणी तक्रारकर्त्यांनी केली.
सदर प्रकरणात दिवाणी दावा दाखल करणे, हा कायदेसंगत मार्ग उपलब्ध असतानाही, २८ वर्षांत पोटे यांच्याविरुद्ध तसा दावा दाखल का केला नाही, या प्रश्नाला तक्रारकर्ते उत्तर देऊ शकले नाहीत. खरेदीत व्यक्तिगतरीत्या फसवणूक झाल्याचा जाहीर आरोप करताना त्यासाठीचा प्रमुख पुरावा असलेली खरेदी व्यवहाराची प्रत मात्र आरोपकर्त्या ११ व्यक्तींपैकी एकानेही निवेदनासोबत दिली नाही. पत्रकारांनी मागणी केल्यानंतरही ती उपलब्ध करून देण्यात आली नाही.

Web Title: Cancel purchase of land in Potte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.