पेट्रोल-डिझेलची दरवाढ रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 22:34 IST2018-05-23T22:34:23+5:302018-05-23T22:34:35+5:30
महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या शासनाला आता आश्वासनाचा विसर पडला आहे. जीवणावश्यक वस्तूंसह पेट्रोल-डिझेलचे दर रोज वाढतच आहे.

पेट्रोल-डिझेलची दरवाढ रद्द करा
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या शासनाला आता आश्वासनाचा विसर पडला आहे. जीवणावश्यक वस्तूंसह पेट्रोल-डिझेलचे दर रोज वाढतच आहे. इंधनावर अवाजवी कर लावून केंद्र व राज्य शासन जनतेची लूट करीत असल्याचा आरोप करीत शहर काँग्रेसद्वारा जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी निदर्शने करण्यात आली व मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
महागाई कमी करण्याचा शासनाला सोईस्कर विसर पडला आहे. पेट्रोल व डिझेलवर केंद्र व राज्य शासनाने ४० ते ५० टक्के अवाजवी कर लावला आहे. त्यामुळे या इंधनावरील कर रद्द करून त्यांना जीएसटीच्या कक्षेत आणा असी मागनी शहर काँग्रेसचे अध्यक्ष किशोर बोरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यामार्फत शासनाला दिलेल्या निवेदनात केली. यावेळी शासन निषेधाच्या घोषणा देण्यात आल्यात. आंदोलनात पुष्पा बोंडे, यशवंतराव शेरेकर, सुरेंद्र भुयार, प्रल्हादराव ठाकरे, भैया पवार, गणेश पाटील, बीआर देशमुख, विजय बोंडे, आनंद भांबोरे, वसंतराव साऊरकर, बाबुशेट खंडेलवार, बबलू शेखावत, विलास इंगोले, वंदना कंगाले, नीलिमा काळे, प्रशांत डवरे, प्रदीप हिवसे, शोभा शिंदे सलीम बेग, युसूफ बेग यांच्यासह शहर काँग्रसचे पदाधिकारी उपस्थित होते.