के. के. केम्ब्रिजच्या विद्यार्थ्यांनी केले डीएनए विश्लेषण

By Admin | Updated: December 25, 2016 00:16 IST2016-12-25T00:16:58+5:302016-12-25T00:16:58+5:30

स्थानिक के. के. केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये विज्ञानातील जीवशास्त्राशी संबंधित कार्यक्रम आयोजित

Of Of Cambridge students done DNA analysis | के. के. केम्ब्रिजच्या विद्यार्थ्यांनी केले डीएनए विश्लेषण

के. के. केम्ब्रिजच्या विद्यार्थ्यांनी केले डीएनए विश्लेषण

शालेय स्तरावरील शिक्षण : एक नवा उपक्रम
अमरावती : स्थानिक के. के. केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये विज्ञानातील जीवशास्त्राशी संबंधित कार्यक्रम आयोजित केला गेला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिक आदिती बोरकर यांनी विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी प्रायोगिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ज्यामध्ये त्यांनी जीवशास्त्राविषयी डीएनएचे मॉडेल्सचे प्रात्यक्षिक करून दाखविले. विद्यार्थ्यांच्या मनातील सर्व शंका व विचारांचे आणि कोड्यांचे त्यांनी वर्णन केले. एक्स-रे क्रिस्टलोग्राफीची माहिती दिली.
वैज्ञानिक आदिती बोरकर यांचा जन्म अमरावती येथेच झाला आहे. लहानपणापासूनच त्यांना वैज्ञानिक विषयात आवड होती. त्यांचे उच्च शिक्षण केम्ब्रिज विद्यापीठातून पूर्ण झाले. सध्या त्या सर हेनरी वेलकम पोस्ट डॉक्टरेट यूएसएच्या येल विद्यापीठात करीत आहे. के.के. केम्ब्रिज इंटरनेशनल स्कूलच्या जीवशास्त्र विषय कार्यक्रमात विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका मीनू खान व शिक्षिका सोहना दासगुप्ता यांचा सहभाग होता. (प्रतिनिधी)

Web Title: Of Of Cambridge students done DNA analysis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.