शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

'धमकी दिली तरच फोन करा' ११२ वर कॉल केला असता पोलिसांकडून चौकशीसाठी येण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 20:41 IST

Amravati : संशयित व्यक्तीची माहिती देण्यासाठी केला होता कॉल अवमानजनक शब्दांचा सामना

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : साहेब, माझ्या घरासमोर एक संशयित व्यक्ती सायंकाळी दिसला. त्याला हटकले असता, रात्री ९ वाजता तो परत सहकाऱ्याला घेऊन आला. याची माहिती ११२ क्रमांकावर कॉल करून देणाऱ्या शहरातील एका प्रतिष्ठित नागरिकाला अवमानजनक पोलिसांकडून शब्दांचा सामना करावा लागला.

सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांची हेल्पलाइन म्हणून ११२ या क्रमांकावर डायल केले जाते. मंगळवारी रात्री ९ वाजता शहरातील प्रतिष्ठित नागरिक तथा कंत्राटदार प्रमोद डेरे यांनी कॉल करून दोन संशय ते इसम घराकडे फिरत असल्याची माहिती दिली. पोलिसांना कॉल केल्यावर मदत मिळेल, ही त्यांची अपेक्षा होती. मात्र, ती पूर्णतः फोल ठरली.

मंगळवारी सायंकाळी ७:३० वाजता प्रमोद डेरे यांच्या घरासमोर एक संशयास्पद इसम सिगारेट पीत उभा होता. त्यांनी त्याला हटकले असता, तो निघून गेला. रात्री नऊ वाजताच्या सुमारास परत तो दुसऱ्या सहकाऱ्यासह आला. 

डेरे यांचा संशय बळावल्याने त्यांनी ११२ या क्रमांकावर डायल केले. उलटटपाली त्यांना फोनवर विविध प्रश्नांची सरबत्ती केली गेली. त्या व्यक्तीने तुम्हाला शिवीगाळ केली का? धमकी दिली का मग आम्ही येऊ शकत नाही, म्हणत आपल्या कर्तव्याचा परिचय दिला. हा सर्व प्रकार सोशल मीडियावर डेरे यांनी स्पष्ट केला. त्यावर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

चोऱ्या वाढल्या

जुळ्या शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणातच चोरीचे सत्र सुरू आहे. बंद घरे निशाण्यावर असताना मंदिरेसुद्धा चोरट्यांनी सोडले नाहीत.

"आपण सक्षम आहोत; परंतु संशयित व्यक्ती दिसल्यावर पोलिसांना माहिती देणे माझे कर्तव्य होते. मात्र, त्याउलट अपमानास्पद वागणूक मिळाली."- प्रमोद डेरे, परतवाडा 

English
हिंदी सारांश
Web Title : Call 112 Only if Threatened: Police Refuse Inquiry Request

Web Summary : A Paratwada resident faced rude police responses after reporting suspicious individuals to 112. Despite rising thefts, police allegedly prioritize action only upon direct threats, sparking public outrage over their perceived dereliction of duty.
टॅग्स :AmravatiअमरावतीPoliceपोलिस