चिखलदऱ्यात साकारणार ‘कॅक्टस्’ गार्डन

By Admin | Updated: July 29, 2015 00:24 IST2015-07-29T00:24:33+5:302015-07-29T00:24:33+5:30

मेळघाटातील निसर्ग सौंदर्याचा सर्वांना लाभ घेता यावा, पर्यटन वाढीसाठी चिखलदरा येथे कॅक्ट्स गार्डन ...

Cactus' garden will be set in the maze | चिखलदऱ्यात साकारणार ‘कॅक्टस्’ गार्डन

चिखलदऱ्यात साकारणार ‘कॅक्टस्’ गार्डन

पालकमंत्री पोटे : पक्षिमित्र वृक्षांचीही लागवड करणार
अमरावती : मेळघाटातील निसर्ग सौंदर्याचा सर्वांना लाभ घेता यावा, पर्यटन वाढीसाठी चिखलदरा येथे कॅक्ट्स गार्डन (निवडुंग उद्यान) व पक्षी मित्र वृक्ष योजना पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करु, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.
मेळघाटमध्ये इको टुरिझम वाढविणे, वनक्षेत्र वाढविणे, वनहक्क कायद्यांतर्गत प्रलंबित प्रकरणा संदर्भात येथील मुख्य वनसंरक्षकांच्या कार्यालयात जिल्ह्यातील वन्यजीव विभाग व उपवनसंरक्षकांची बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते.
बैठकीस जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांच्यासह मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक व मुख्य वनसंरक्षक दिनेश त्यागी, मुख्य वनसंरक्षक संजीव गौड, नागपूर येथील राज्य जैव विविधता मंडळाचे अध्यक्ष विलास बर्डेकर, मेळघाट व्याघचे उपवनसंरक्षक रवींद्र वानखडे, उमेश वर्मा, धारणीचे उपवनसंरक्षक मनीष कुमार, अमरावतीचे उपवनंसरक्षक निनू सोमराज, मानद वन्यजीव रक्षक जयंत वडतकर, सहायक वनसंरक्षक मोरनकर, चिखलदरा परिसर विकास समितीचे संयोजक उल्हास मराठे, श्याम देशपांडे आदी उपस्थित होते.
मेळघाटात सुमारे २५६ विविध प्रकारचे दुर्मीळ पक्षी आहेत. ३६ प्रकारचे कॅकट्स आहेत. दुर्मीळ अशा अनेक वनस्पतींची जणुके मेळघाटातच आहेत. त्याचा लाभ निसर्गप्रेमींना, पर्यटनप्रेमींना व्हावा यासाठी चिखलदरा परिसर विकास समितीचे संयोजक उल्हास मराठे यांनी पालकमंत्र्यांपुढे चिखलदरा येथील वन विभागात कॅकट्स गार्डन व पक्षिमित्र वृक्ष योजनेची संकल्पना मांडली. यासाठी सुमारे २० लाखांचा खर्च येणार असून ती देण्याची व्यवस्था आपण करु, असे आश्वासन पालकमंत्री पोटे यांनी दिले. कॅकट्स गार्डनमध्ये सुमारे १७५० विविध प्रकारचे कॅकट्स लावण्यात येणार आहेत. यामध्ये शोभेची व औषधी, जंगलात सापडणारे कॅक्ट्स (निवडुंग) चा समावेश राहील. पर्यटकांना येथील दुर्मीळ पक्ष्यांची माहिती व्हावी म्हणून चिखलदरा बसस्थानकालगतच्या जागेत पक्षिमित्र वृक्ष संकल्पना राबवीत आहे. मोठे कृत्रिम सिमेंटचे झाड उभारुन त्यावर मेळघाटातील दुर्मीळ पक्ष्यांची प्रतिकृती व त्यांची घरटी तयार करण्यात येईल. या संकल्पनेतून मेळघाटातील दुर्मीळ पक्षी, कॅकट्स व लोप पावत असलेल्या दुर्मीळ वनस्पतींचे जतन होण्यास मदत होणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना दुर्मीळ निसर्ग ठेवा पाहण्यास मिळणार आहे.
वडाळी वनपरिक्षेत्रातील सुमारे ४० हेक्टरवर पर्यटन विकास करण्याच्या दृष्टीने ना. पोटे यांनी चर्चा केली. व्याघ्र पत्रिकेचे संपादक श्याम देशपांडे यांनी संकल्पना राबविण्यासाठी उपयुक्त सूचना केल्या.

Web Title: Cactus' garden will be set in the maze

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.