शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Porsche Accident : अपहरण, दबाव, पैशांच्या जोरावर पोर्शे कार अपघाताची थेरी बदलण्याचा कट; 'तो' फोन उलगडणार गुपितं
2
महात्मा गांधी म्हणजे सूर्य, शाखेत जाणाऱ्यांचे प्रमाणपत्र नको; राहुल गांधींचे PM मोदींना उत्तर
3
विशेष लेख: २२०च्या आत? २५० ते २६०, की ३०० ते ३५०? भाजपाला नक्की 'किती' मिळतील?
4
आजचे राशीभविष्य - 30 मे 2024; आजचा दिवस शुभ फलदायी, मित्रांकडून लाभ होतील, अचानक धनलाभ संभवतो
5
‘बाळा’चे बदललेले रक्त बाईचे की आईचे? चाैकशी समितीने सादर केलेल्या अहवालाने खळबळ
6
"तुम्हाला नोकरीवरुन काढून टाकू.," Raghuram Rajan यांना कोण देत होतं धमकी; नंतर RBI गव्हर्नरांनी काय केलं?
7
स्वामीपूजन, आरती झाल्यावर आवर्जून म्हणा ‘स्वामी समर्थ मंत्र पुष्पांजली’; होईल स्वामीकृपा!
8
१८ वर्षांनी राहु शनी नक्षत्रात गोचर: ७ राशींना लॉटरी, शेअर बाजारात फायदा; प्रमोशन, धनलाभ योग!
9
तुमची बर्थडेट ‘या’ ३ पैकी आहे? जून महिन्यात ठरतील लकी, लाभेल सुख-समृद्धी, पद-पैसा वृद्धी!
10
अन्वयार्थ विशेष लेख: वाघ बघितलाच पाहिजे आणि तो पण जवळून; हा कसला हट्ट?
11
पाकच्या मदतीसाठी चीनने उभारले बंकर; नियंत्रण रेषेलगत कम्युनिकेशन टॉवरही बांधले!
12
अग्रलेख: कळ्या-फुलांचा ‘बाजार’! बेपत्ता बालकांमध्ये मुलींच्या प्रमाणात दरवर्षी वाढ
13
सेन्सरच्या त्रुटींमुळे दिल्लीत ५२° तापमानाचा ‘विक्रम’; हवामान विभाग म्हणे- पारा ४६.८° सेल्सिअसच
14
वीकएण्डचा वाजणार बोऱ्या! मध्य रेल्वेवर उद्यापासून तीन दिवस जम्बो ब्लॉक, ९३० फेऱ्या रद्द
15
मनुस्मृती दहन करताना आमदार आव्हाड यांनी फाडला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो
16
कीर्ती व्यास हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप; अत्यंत थंड डोक्याने कृत्य केल्याचा वकिलांचा युक्तिवाद
17
सचिन वाझेच्या तुरुंगाबाहेर पडण्याबाबतच्या अर्जावर उत्तर द्या; उच्च न्यायालयाचे सीबीआयला निर्देश
18
सरकारी कर्मचारी भ्रष्ट म्हणणे तक्रारदाराला भाेवले; कारवाई रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
19
राधानगरीतील ८४ गावांत वाढणार इको टुरिझम; MSRDCकडून विकास आराखड्याचे काम सुरू
20
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!

चल लग्न करू म्हणत केला अतिप्रसंग!

By प्रदीप भाकरे | Published: May 06, 2024 6:03 PM

मोर्शी तालुक्यातील घटना : आरोपीला तत्काळ अटक

अमरावती : एका २१ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष देऊन घरी नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. २४ एप्रिल रोजी रात्री ११ ते पहाटे पाचच्या सुमारास ती घटना घडली. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून ४ मे रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. तथा आरोपी मंगेश भीमराव कापसे (२७, रा. ता. मोर्शी)) याच्याविरुद्ध बलात्कार व ॲट्राॅसिटीचा गुन्हा नोंदवून त्याला ५ मे रोजी अटक करण्यात आली.             

तक्रारीनुसार, २१ वर्षीय फिर्यादी हिला आरोपीने फोन कॉल करत गावाच्या बाहेर भेटायला बोलाविले. २४ एप्रिल रोजी सकाळी ११ च्या सुमारास ती त्याला भेटायला गेली असता, मी तुला न्यायला आलो आहे. तु माझ्यासोबत गावाला चल आपण दोघेजण लग्न करू, अशी बतावणी त्याने केली. ती आरोपीच्या गाडीवर बसून दोघेही मोर्शी येथे आले. दरम्यान आता रात्र झाली आहे, तु माझे घरी चल, असे आरोपी म्हणाला. त्यामुळे ती मंगेश कापसे याच्यासोबत त्याच्या घरी गेली. रात्री ११ च्या सुमारास ती त्याच्या घरी पोहोचली असता त्याचे कुटुंबीय झोपलेले होते. त्यामुळे तु स्लॅपवर झोप, मी खाली झोपतो. उद्या तुला घरी सोडून देतो, असे आरोपीने तिला बजावले. ती स्लॅपवर झोपायला गेली असता एक ते दीड तासानंतर आरोपी हा तिच्याजवळ आला. मी तुझ्यावर प्रेम करतो, मला शरीरसंबंध स्थापित करू दे, अशी मागणी त्याने केली. त्यावर तरुणीने नकार दिला असता आरोपीने तिच्यावर शारीरिक अत्याचार केला.

पिडितेला मावशीच्या घरी सोडलेआरोपी मंगश कापसे याने २५ एप्रिल रोजी पहाटे पाचच्या सुमारास तिला तिच्या मावशीच्या घरी सोडून दिले. तो नामानिराळा झाला. ती घरी पोहोचली. मात्र स्वत:सोबत झालेले अघटित तिला स्वस्थ बसू देत नव्हते. अखेर तिने घडलेला सर्व प्रकार कुटुंबीयांच्या कानावर घातला. त्यांनी तिला धीर देत पोलिस तक्रार करण्याची सूचना केली. त्यानुसार, त्या २१ वर्षीय तरुणीने ४ मे रोजी रात्री मोर्शी पोलिस ठाणे गाठत तक्रार नोंदविली.

टॅग्स :Amravatiअमरावतीmarriageलग्न