टोकनच्या चार लाख क्विंटल तुरीची शासन खरेदी

By Admin | Updated: July 7, 2017 00:27 IST2017-07-07T00:27:00+5:302017-07-07T00:27:00+5:30

केंद्राने मुदतवाढ बाजार हस्तक्षेप योजनेची मूदत १० जून रोजी संपुष्टात आल्यानंतर अद्यापही मुदतवाढ

Buy Tocque's four lakh quintals of turf | टोकनच्या चार लाख क्विंटल तुरीची शासन खरेदी

टोकनच्या चार लाख क्विंटल तुरीची शासन खरेदी

शेतकऱ्यांना दिलासा : १८ हजार शेतकऱ्यांना शासनादेशाची प्रतीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : केंद्राने मुदतवाढ बाजार हस्तक्षेप योजनेची मूदत १० जून रोजी संपुष्टात आल्यानंतर अद्यापही मुदतवाढ दिलेली नाही. त्यामुळे टोकन दिलेल्या किमान १८ हजार ६४५ शेतकऱ्यांची चार लाख १६ हजार क्विंटल तूर घरी पडून होती. मात्र शासनाद्वारा ही तूर खरेदी करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्र्यांनी केल्यामुळे यंदाच्या खरिपात आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात १० मे पासुन पीएसएस योजनेव्दारा तुरीची खरेदी करण्यात आली. मात्र केंद्र शानाने निर्धारीत केलेला कोट्याची तूर २६ मे रोजी पूर्ण झाल्याने जिल्ह्यासह राज्यातील सर्व तूर खरेदी केंद्र बंद करण्यात आली.त्यामुळे विहीत कालावधीत राज्य शासनाव्दारा बाजार हस्तक्षेप योजना राबविण्यात आली. व बाजार समित्यांच्या आवारात उघड्यावर परंतू टोकन देण्यात आलेल्या तुरीची खरेदी करण्यात आली. मात्र ही मुदत देखील १० जून रोजी संपल्याने ज्या केंद्रावर तूर खरेदी व मोजणी बाकी होती.त्या तुरीची प्रथम खरेदी करण्यात आली.मात्र टोकन दिलेल्या शेतकऱ्यांच्या तुरीच्या खरेदी विषयी कोणतेच आदेश नसल्याने खरीपाच्या पेरणीच्या काळात शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले होते.आता मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी बुधवारी १०जून पर्यत टोकन दिलेल्या शेतकऱ्यांची तूर येत्या दोन दिवसात खरेदी करण्यात येईल असे अस्वासन दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

व्यापाऱ्यांद्वारा बेभाव खरेदी
४यंदाचा खरीप हंगाम सुरू झाल्याने शेतकरी अडचणीत आहे, हे हेरून हमीभावापेक्षा दीड ते दोन हजार रूपये कमी भावाने व्यापाऱ्यांद्वारा तुरीची खरेदी करण्यात आली.काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर टोकन घेतल्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात त्यापेक्षा कमी तूर शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे.

अशी आहे तूर खरेदी बाकी
४जिल्ह्यात सद्यस्थितीत अचलपूर केंद्रावर १,७९५ शेतकऱ्यांची ३७,१५२ क्विंटल, अमरावती केंद्रावर ३,६५० शेतकऱ्यांची १,२,४६९, अंजनगाव केंद्रावर २,१४९ शेतकऱ्यांची ३५,६०७ चांदूरबाजार केंद्रावर १,२३३ शेतकऱ्यांची २३,५११, चांदूररेल्वे केंद्रावर १,७६९ शेतकऱ्यांची ३३,९७२ दर्यापूर केंद्रावर २,७३८ शेतकऱ्यांची ७४,०५६, धामणगाव केंद्रावर ३३३ शेतकऱ्यांची ११,५७३ मोर्शी केंद्रावर १,९१५ शेतकऱ्यांची ३८,९३१, नांदगाव खंडेश्वर केंद्रावर १७९२ शेतकऱ्यांची ३४,३४४, तिवसा केंद्रावर ९२३ शेतकऱ्यांची २१,१५३, व वरूड केंद्रावर २६४ शेतकऱ्यांची २,१४४ क्विंटल तुरीची खरेदी व मोजणी व्हायची आहे.

४७ हजार शेतकऱ्यांची ९.५७ लाख क्विंटल तूर खरेदी
४जिल्ह्यात १० जून पर्यत ४७ हजार ९७६ शेतकऱ्यांची नऊ लाख ५७ हजार २६५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.यामध्ये जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांद्वारा ३६ हजार ८१३ शेतकऱ्यांची सात लाख ३२ हजार २५५ क्विंटल, व्हीसीएमएफ द्वारा १० हजार ७६० शेतकऱ्यांची दोन लाख २० हजार ५४७ क्विंटल, आदिवासी विकास महामंडळाद्वारा ४०० शेतकऱ्यांची चार हजार ४६२ क्विंटल तूर खरेदी करण्यात आलेली आहे.

Web Title: Buy Tocque's four lakh quintals of turf

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.