गैरहजर अधिकाऱ्यांना फोडला घाम

By Admin | Updated: June 8, 2017 00:14 IST2017-06-08T00:14:18+5:302017-06-08T00:14:18+5:30

धारणीवासियांना तब्बल १० वर्षांनंतर पालकमंत्र्यांसोबत संवाद साधण्याची संधी मिळाल्याने ग्रामस्थांनी त्यांच्यासमोर तक्रारींचा रतिब घातला.

Busted busted officers | गैरहजर अधिकाऱ्यांना फोडला घाम

गैरहजर अधिकाऱ्यांना फोडला घाम

ग्रामस्थांनी मांडल्या समस्या : धारणीत पालकमंत्र्यांची बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : धारणीवासियांना तब्बल १० वर्षांनंतर पालकमंत्र्यांसोबत संवाद साधण्याची संधी मिळाल्याने ग्रामस्थांनी त्यांच्यासमोर तक्रारींचा रतिब घातला. जनतेच्या अत्यंत क्षुल्लक समस्या स्थानिक पातळीवर अधिकारी सोडवित नसल्याचे लक्षात येताच पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी आढावा बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.
पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नवसंजीवनी आढावा बैठक घेतली. यावेळी अनेक विभागप्रमुखांची अनुपस्थिती होती. ही बाब पालकमंत्र्यांनी फार गांभीर्याने घेतली. मेळघाटसारख्या संवेदनशील भागात अधिकाऱ्यांचा हा बेजबाबदारपणा दुर्लक्षित करण्यासारखा नाही, असे सांगून पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना समज दिली. बैठकीला आ.प्रभुदास भिलावेकर, राजकुमार पटेल, गजानन कोल्हे उपस्थित होते. बैठकीत सर्वाधिक तक्रारी मनरेगाच्या मजुरीसंदर्भात आल्याने सर्व विभागप्रमुखांना काम होताच मजुरीचा चुकारा करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिलेत.

सन २००७-०८ मध्ये तत्कालीन पालकमंत्री देशमुखांनी घेतली होती बैठक
सन २००७-०८ मध्ये माजी पालकमंत्री सुनील देशमुख यांनी प्रकल्प अधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली होती. त्यानंतर तब्बल १० वर्षांनंतर आढावा बैठक घेणारे प्रवीण पोटे हे दुसरे पालकमंत्री ठरले. त्यामुळे जनतेने त्यांची गाऱ्हाणी, तक्रारींचा पाढाच पालकमंत्र्यांसमोर वाचला.

Web Title: Busted busted officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.