बसची दुचाकीला धडक, दोन ठार

By Admin | Updated: May 18, 2015 00:12 IST2015-05-18T00:12:24+5:302015-05-18T00:12:24+5:30

अमरावतीवरुन - दर्यापूरकडे जाणाऱ्या भरधाव खासगी बस चालकाने दुचाकीला जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण ..

The bus hit two bikes, two killed | बसची दुचाकीला धडक, दोन ठार

बसची दुचाकीला धडक, दोन ठार

एक गंभीर : संतप्त जमावाकडून बसची नासधूस
दर्यापूर : अमरावतीवरुन - दर्यापूरकडे जाणाऱ्या भरधाव खासगी बस चालकाने दुचाकीला जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार तर एक जण गंभीररीत्या जखमी झाला. हा भीषण अपघात रविवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास अमरावती-दर्यापूर मार्गावरील आराळा ते लाखापूर मार्गावर झाला. अपघात एवढा भयंकर होता की, दुचाकीस्वारांचे डोके चेंदामेंदा झाले होते.
नाजुकराव रायभान हिवराळे (६० रा. नायगाव), दिलीप गोविंद हिवराळे (४२, रा.नायगाव) अशी मृतांची नावे आहेत. अपघातातील जखमीची ओळख मात्र वृत्तलिहेस्तोवर पटली नव्हती. नाजुकराव हिवराळे व दिलीप हिवराळे हे दोघेही लग्नसमारंभात सहभागी होण्यासाठी मुर्तिजापूरला गेले होते. लग्न आटोपून गावाकडे परतत असताना आराळा ते लखापूर मार्गावर एसटीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरुन येणाऱ्या खासगी बसने त्यांना जोरदार धडक दिली. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातग्रस्त दुचाकीचा क्रमांक एम.एच.२७ए.एच.५९२२ असून खासगी लक्झरी बसचा क्रमांक एम.एच.२७ए-९१३१ असा आहे. घटनेची माहिती मिळताच खल्लार पोलीस ठाण्याचे ठाणेदार आशीष इंगळे व दर्यापूरचे ठाणेदार जे.के. पवार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी दर्यापुरच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. पोलीस पुढील तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The bus hit two bikes, two killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.