बसमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:08 IST2021-03-29T04:08:30+5:302021-03-29T04:08:30+5:30

अमरावती : बसमध्ये प्रवासादरम्यान खिडकी उघडण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याची आठ हजार रुपयांची पोत एका महिला आरोपीने तोडली. ही ...

The bus broke the gold texture around the woman's neck | बसमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडली

बसमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडली

अमरावती : बसमध्ये प्रवासादरम्यान खिडकी उघडण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याची आठ हजार रुपयांची पोत एका महिला आरोपीने तोडली. ही घटना अमरावती ते वलगाव प्रवासादरम्यान घडली. याप्रकरणी पोलिसांनी कामनापूर (जावरा) येथील ३५ वर्षीय आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंदविला. याप्रकरणी पिंपळखुटा येथील ६५ वर्षीय महिलेने तक्रार नोंदविली.

पोलीससूत्रानुसार, फिर्यादी महिला ही बोराळा गावात जाण्याकरिता अमरावती मध्यवर्ती आगारातून बसमध्ये बसली. आरोपी महिलेने फिर्यादी महिलेच्या खांद्यावर हात ठेवून खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला. एसटी वलगावला जात नाही म्हणून बस थांबवून उतरून गेली. महिलेला संशय आल्याने तिने गळ्यात पोत बघितली असता, लक्षात आले. त्याचवेळी महिलासुद्धा खाली उतरली. तिला लोकांच्या मदतीने पकडले. पोलीस ठाण्यात आणून अंगझडती घेतली असता पोत मिळून आली.

Web Title: The bus broke the gold texture around the woman's neck