चार एकरातील ऊस जळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 22:59 IST2018-05-20T22:59:38+5:302018-05-20T22:59:38+5:30
येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या ऐवजपूर शिवारात आग लागल्याने ४ एकरांतील ऊसाचे पीक जळाल्याची घटना शनिवारी घडली. शेताच्या काठावरून गेलेल्या ३३ केव्ही वीज वाहिनीच्या स्पार्किंगमुळे सदर आग लागल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे.

चार एकरातील ऊस जळाला
लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या ऐवजपूर शिवारात आग लागल्याने ४ एकरांतील ऊसाचे पीक जळाल्याची घटना शनिवारी घडली. शेताच्या काठावरून गेलेल्या ३३ केव्ही वीज वाहिनीच्या स्पार्किंगमुळे सदर आग लागल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी स्पार्किंगमुळे आगी लागत असताना व सदर समस्या वीज वितरण कंपनीच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्या निवारण करीत नसल्याचा आरोप शेतकºयाने केला.
शहराच्या लगतच असलेल्या खेड बाबुजी व मौजे ऐवजपूर शेत सर्व्हे नं. १२८, २०/२, २०/२ ब, २०/२ क मध्ये हिंमत हेंड व गोपाल हेंड यांचे शेत आहे. येथील स्पार्किंगच्या घटनांबाबत शेतकºयांनी वीज वितरण कंपनीला सूचना दिल्या असताना यावर उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे या शेतकºयाच्या शेतातील अर्धा एकराचे निंबूची झाडे, २० ते ३० फणसाची झाडे व इतरही फळझाडे व चार एकरांचा उभा ऊस अंदाजे ४ ते ५ लाखांचे नुकसान झाले. त्यामुळे आधीच शेतकरी अर्थिक संकटात असताना वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे त्यांच्यावर संकट कोसळले आहे. या घटनेची चौकशी आदेश आ.रमेश बुंदिले यांनी संबंधित विभागाला दिले असून, अंजनगावचे सहायक एपीआय शेख करीत आहेत.
या धोकादायक वीज वाहिनीची आम्ही दोन वर्षांपासून माहिती देत आहे. अशीच घटना गतवर्षी घडली असताना वीज वितरण कंपनीने या गंभीर बाबीची दखल घेतली नाही. परिणामी आज आमचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ह्याला सर्वस्वी जबाबदार वीज वितरण कंपनी आहे.
- गोपाल हेंड,
शेतकरी, ऐवजपूर
सदरची विद्युत वाहिनी ३३ केव्हीची असून, ती चिखलदरा डिव्हीजनची असल्याने देखभालीची जबाबदारी चिखलदरा कार्यालयाची आहे. याबाबत आम्ही त्यांना वेळोवेळी कळविले. सदर घटनेचा पंचनामा केला असून, तसा नुकसानीचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला आहे.
- प्रदीप हिवे, सहायक अभियंता, अंजनगाव