सैदापूर शिवारात एक एकरातील ऊस जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:13 IST2021-03-31T04:13:46+5:302021-03-31T04:13:46+5:30
वरूड : नजीकच्या सैदापूर शिवारात शेजारच्या शेतकऱ्याने बांधावर कपाशीचे वाळलेले बुंधे जाळल्याने दीपक शिंगरवाडे यांच्या शेतातील एक एकरातील ऊस ...

सैदापूर शिवारात एक एकरातील ऊस जळून खाक
वरूड : नजीकच्या सैदापूर शिवारात शेजारच्या शेतकऱ्याने बांधावर कपाशीचे वाळलेले बुंधे जाळल्याने दीपक शिंगरवाडे यांच्या शेतातील एक एकरातील ऊस जळून खाक झाला.
प्राप्त माहितीनुसार, वरूड शहरालगत असलेल्या मौजा सैदापूर शिवारात मनोहर श्यामराव वऱ्होकार यांचे शेत दीपक शिंगरवाडे यांनी उसाच्या लागवडीकरिता घेतले आहे. त्यांच्या बाजूला कुसुम गुणवंत खोडसकर यांचे शेत आहे. त्यांनी त्यांच्या शेतातील बांधावर कपाशीचे वाळलेले बुंधे २७ मार्च रोजी दुपारच्या सुमारास जाळले. ही आग पसरत जाऊन एक एकरातील ऊस पूर्णतः जळून खाक झाला. यात दीपक शिंगरवाडे यांचे नुकसान झाल्यामुळे ते हवालदिल झाले. तलाठी जी.पी. राऊत यांनी पंचनामा केला. त्यांनी प्रथम पाहणी अहवाल तहसील कार्यालयात सादर केला आहे. हंगामाच्या तोंडावर तोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्यामुळे शासनाच्यावतीने मदत मिळावी, अशी अपेक्षा शेतकरी दीपक शिंगरवाडे यांनी व्यक्त केली.