शहरं
Join us  
Trending Stories
1
Priya Marathe Passes Away: लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी
2
एअर इंडियाच्या विमानाचे आपात्कालीन 'लँडिंग'; हवेत असतानाच इंजिनला लागली आग, प्रवासी सुखरूप
3
LPG, ITR ते क्रेडिट कार्ड... १ सप्टेंबरपासून ‘या’ ७ गोष्टींचा तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
4
"माझा प्रॉब्लेम आहे, मंगळसूत्र चोरांच्या विरोधात मी लढत नाही"; जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकरांना डिवचलं
5
रोहित शर्माची झाली फिटनेस टेस्ट; ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेत खेळणार की नाही? जाणून घ्या
6
"१० वर्षे सत्तेत होता, खोलात जायला लावू नका"; आरक्षणावरुन शरद पवारांच्या सल्ल्यावर अजितदादांचे प्रत्युत्तर
7
नंदुरबारमध्ये शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा नदीतून जीवघेणा प्रवास
8
कहानी में ट्विस्ट! शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी मेलानिया ट्रम्प यांच्या नावाचे नामांकन?
9
आजचे राशीभविष्य, ३१ ऑगस्ट २०२५ : आजचा दिवस शुभ फलदायी, धन लाभ होईल, मानसिक शांतता लाभेल !
10
Mumbai Police: मुंबई पोलीस, गुन्हे शाखेच्या पोलिसांच्याही सुट्ट्या रद्द!
11
शेकडो टॉयलेट, ११ टँकर, ४५० कर्मचारी; आंदोलकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना
12
हलगीचा ताल, झांजेच्या झंकाराने निनादले रस, आंदोलकांचा नाचत जल्लोष 
13
maratha andolan: आझाद मैदानात चिखलात बसून आंदोलन
14
Manoj Jarange: "...तर एकही मराठा घरी दिसणार नाही" जरांगे पाटलांचा इशारा
15
Uddhav Thackeray: सरकारने तुमच्या मागण्यांबाबत...; उद्धव ठाकरेंचा जरांगेंना फोन!
16
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
17
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
18
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
19
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
20
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले

परतवाड्यात ५० लाखांचे फर्निचर जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 06:00 IST

२६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १ च्या सुमारास लागलेल्या आगीत टिपटॉप फर्निचर, अदनान फर्निचर, गुलामे गाजी फर्निचर, सादीरभाई, अबू तालीम, शेख अयूब, मुन्ना हमीद फर्निचर या दुकानांतील साहित्याचा कोळसा झाला. घटनेची माहिती मिळताच अचलपूरचे तहसीलदार मदन जाधव, परतवाडाचे पोलीस निरीक्षक सदानंद मानकर, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांच्यासह प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली.

ठळक मुद्देआठ दुकाने : लाकूड बाजार आगीच्या विळख्यात

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : स्थानिक लाकूड बाजाराला लागलेल्या भीषण आगीत फर्निचरची आठ दुकाने जळून खाक झाली. यात यंत्रसामग्रीसह महागडे फर्निचर जळाल्याने ५० लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.२६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १ च्या सुमारास लागलेल्या आगीत टिपटॉप फर्निचर, अदनान फर्निचर, गुलामे गाजी फर्निचर, सादीरभाई, अबू तालीम, शेख अयूब, मुन्ना हमीद फर्निचर या दुकानांतील साहित्याचा कोळसा झाला. घटनेची माहिती मिळताच अचलपूरचे तहसीलदार मदन जाधव, परतवाडाचे पोलीस निरीक्षक सदानंद मानकर, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांच्यासह प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. हाकेच्या अंतरावरील अचलपूर नगर परिषदेचे अग्निशमन दलाचे वाहन नेहमीप्रमाणे घटनास्थळी उशिरा पोहोचले. त्यातही वाहन क्रमांक एमजीएस १०८२ हे नादुरुस्त असल्याचे निदर्शनास येताच घटनास्थळावरून परत न्यावे लागले. अवघा लाकूडबाजार आगीने कवेत घेतल्याने अनर्थ टाळण्याच्या उद्देशाने अमरावती महापालिकेसह चिखलदरा, अंजनगाव, चांदूर बाजार, दर्यापूर येथील अग्निशमन वाहन एकामागून एक दाखल झाले. अखेर तीन तासांनी या सर्वांच्या परिश्रमाने आग नियंत्रणात आली. आगीचे उग्र रूप बघून काही दुकानदारांनी आपापल्या दुकानातील लाकूड व तयार फर्निचर तितक्याच रात्री रस्त्यावर काढण्याचा प्रयत्न केला. ही आग नेमकी कशाने लागली, याची माहिती अद्याप कळू शकली नाही.वारंवार आगी लागत असल्या तरी दुकानदारांनी दुकानांचा विमा काढलेला नसल्याने आताच्या नुकसानाची भरपाई कोण देणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.वारंवार आगीच्या घटनालाकूडबाजाराला यापूर्वी सन १९९७, २००१, २००२, २०१६, २०१७ मध्ये आग लागली. यापैकी सन २०१७ मध्ये लागलेल्या आगीत फारच मोठे नुकसान झाले होते. यापुढे आगीची घटना टाळण्याच्या दृष्टीने शासनाने उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.

टॅग्स :fireआग