वडगाव माहोरे येथे तीन ठिकाणी घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:14 IST2021-03-08T04:14:08+5:302021-03-08T04:14:08+5:30
याप्रकरणी नांदगावपेठ पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा नोंदविला. याप्रकरणी डॉ. राजेंद्र पाटील (६४, रा. वडगाव ...

वडगाव माहोरे येथे तीन ठिकाणी घरफोडी
याप्रकरणी नांदगावपेठ पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा नोंदविला. याप्रकरणी डॉ. राजेंद्र पाटील (६४, रा. वडगाव माहोरे, ह.मु. हमालपुरा) यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली.
पोलीसुत्रानुसार, फिर्यादीला फोनव्दारे माहिती मिळाली की, तुमच्या घराचे कुलूप तुटलेले आहे. त्यांनी घटनास्थळी जावून बघितले असता, बेडरुमधमील कपाटातील लक्ष्मीपुजनाचे सोने चांदीचे शिक्के व इतर साहित्य चोरुन नेले. फिर्यादीच्या शेजारी राहणारे डिगांबर अजाबराव वैद्य, दिपक प्रल्हादराव माहोरे (६०), अविनाश रुपराव माहोरे (४९), रमेश पंजाबराव माहोरे(५८) यांच्या घराचे दरवाज्याचे कुलूप तुटलेले दिसले परंतू सदर इसमांच्या घरातून कुठलेही साहित्य चोरीला गेले नाही. डिंगाबर वैद्य यांना रात्री १ वाजताच्य सुमारास २५ वर्ष वयोगटातील दोन अज्ञात चोरटे येथून जाताना दिसले. या अधिकचा तपास नांदगावपेठ पोलीस करीत आहेत.