घरफोडी, ९० हजाराचे सोन्याचे दागिन्यांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:09 IST2021-05-03T04:09:04+5:302021-05-03T04:09:04+5:30
या प्रकरणी गाडगेनगर पोलिसानी अज्ञात आरोपीविरुद्ध भादविची कलम ४५७,४५४,३८० अन्वये गुन्हा नोंदविला आहे. फिर्यादी रामेश्वर उत्तमराव सोळंके (५९श रा. ...

घरफोडी, ९० हजाराचे सोन्याचे दागिन्यांची चोरी
या प्रकरणी गाडगेनगर पोलिसानी अज्ञात आरोपीविरुद्ध भादविची कलम ४५७,४५४,३८० अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
फिर्यादी रामेश्वर उत्तमराव सोळंके (५९श रा. गंगोत्री नगर) यांनी पोलिसात तक्रार नोंदविली. फिर्यादी हे मुलीच्या लग्नाकरीता दर्यापुर येथे कपडे खरेदी करण्याकरीता शनिवारी सकाळी गेले होते. हीच संधी साधून अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून २७ ग्रॅम सोन्याचे पोत, तसेच इतर सोने व १७ हजार १०० रूपये रोक चोरून नेले. रविवारी गाडगेनगरचे पोलीस निरीक्षक विजय यादव, पीआय मोहन कदम यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. तसेच यावेळी एसीपी शिवाजी धुमाळ यांनी सुद्धा घटनास्थळाला भेट दिली. या प्रसंगी श्वान पथक, व फिंगर प्रिट पथकाला पाचारण करण्यात आले होते. पुढील तपास पोलीस करीत आहेत.