पारडी कुंभारगाव येथे घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:17 IST2021-09-06T04:17:04+5:302021-09-06T04:17:04+5:30

वनोजा बाग : रहिमापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारडी कुंभारगाव या गावात ४ सप्टेंबर रोजी कावरे यांच्या कुलूपबंद घरावर शेजारच्या ...

Burglary at Pardi Kumbhargaon | पारडी कुंभारगाव येथे घरफोडी

पारडी कुंभारगाव येथे घरफोडी

वनोजा बाग : रहिमापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारडी कुंभारगाव या गावात ४ सप्टेंबर रोजी कावरे यांच्या कुलूपबंद घरावर शेजारच्या युवकाने हात साफ केला.

बेबी कावरे व प्रज्वल कावरे या आई-मुलाच्या घरात ही घटना घडली. बेबी कावरे यांची प्रकृती ठीक नसल्याने प्रज्वलने त्यांना अकोला येथे दाखल केले. तोदेखील अकोला येथे होता. ४ सप्टेंबरला परतले तेव्हा घराच्या आतील दाराचे कुलूप तुटलेले व बाजूला एक लोखंडी सळई पडलेली होती. बेडरूममध्ये लोखंडी कपाटाची पाहणी केली असता सोन्याची अंगठी, पोत व रोख दोन हजार असा एकूण ४४ हजार २६० रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आल्याचे निदर्शनास आले. अविनाश दशरथ कावरे यांनी शेजारी राहणार स्वराज अमोल बानुवाकोडे (२०) याच्याविरुद्ध संशय व्यक्त केला. ठाणेदार सचिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार सुरेंद्र रायबोले, हेडकॉन्स्टेबल नागोराव जऊळकर, उमेश नागदिवे यांनी परिस्थितीजन्य पुराव्यावरून स्वराजला ताब्यात घेतले. अंजनगावसुर्जी न्यायालयाने त्याला ७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पुढील चौकशी रहिमापूर पोलीस करीत आहेत.

Web Title: Burglary at Pardi Kumbhargaon