अरुण कॉलनीत घरफोडी, ७२ हजारांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:12 IST2021-01-23T04:12:58+5:302021-01-23T04:12:58+5:30
अमरावती : बाहेरगावी गेलेल्या फिर्यादींच्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारला. घराचे कुलूप-कोयंडा तोडून कपाटाच्या ड्राव्हरमधील नगदी व चिल्लर असे एकूण ...

अरुण कॉलनीत घरफोडी, ७२ हजारांची
अमरावती : बाहेरगावी गेलेल्या फिर्यादींच्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारला. घराचे कुलूप-कोयंडा तोडून कपाटाच्या ड्राव्हरमधील नगदी व चिल्लर असे एकूण ७२ हजाराची चोरी केली. ही घटना २० जानेवारी रोजी उघडकीस आली. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी गुरुवारी गुन्हा नोंदविला.
फिर्यादी अमोल बाळकृष्ण तराळ (३९, रा. अरुण कॉलनी) यांनी गाडगेनगर ठाण्यात तक्रार नोंदविली. फिर्यादी हे ८ जानेवारीला परिवारासह काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यानंतर, त्यांना २० जानेवारी रोजी मित्र दिनेश कडू यांना घरासमोरून चक्कर मारण्यास सांगितले. ते गेले असता, त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी ही माहिती फिर्यादी यांना दिले. त्यानंतर, त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली. आरोपीविरुद्ध भादंविची कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा नोंदविला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.