शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

स्वातंत्र्यानंतर अमरावती जिल्ह्यातील बुलुमगव्हाणमध्ये प्रथमच आली वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 11:15 AM

दिवसभर राब-राब रानात राबल्यानंतर सायंकाळी घरी गेल्यावर टिमटिमत्या चिमणीच्या ज्योतीवर रात्र घालवणाऱ्या अतिदुर्गम भागातील बुलुमगव्हाण आदिवासी पाड्यातील रहिवाशांसाठी १५ मार्चची रात्र अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी ठरली.

ठळक मुद्देप्रत्येक घरी मोफत जोडणीमहावितरणने ‘सौभाग्य’ योजनेतून पेरला प्रकाश

गजानन मोहोड।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दिवसभर राब-राब रानात राबल्यानंतर सायंकाळी घरी गेल्यावर टिमटिमत्या चिमणीच्या ज्योतीवर रात्र घालवणाऱ्या अतिदुर्गम भागातील बुलुमगव्हाण आदिवासी पाड्यातील रहिवाशांसाठी १५ मार्चची रात्र अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी ठरली. महावितरणने पंतप्रधान सहज बिजली म्हणजेच ‘सौभाग्य’ योजनेच्या माध्यमातून विकासाचा हात देत येथील आदिवासींच्या जीवनात प्रकाश पेरला. कित्येक पिढ्यांनंतर या गावात वीज आल्याने तेथील आदिवासींचे चेहरे आनंदाने फुलले होते.सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या मेळघाटातील बुलूमगव्हाण या शंभरेक घरे असलेल्या पाड्यात सायंकाळनंतर अंधाराचेच साम्राज्य राहायचे. वीज काय असते तेच माहित नव्हते. त्यामुळे विजेचे महत्त्व कळणे तर दूरच झाले. वीज नसल्याने नळ नाही. कोणतेही करमणुकीचे साधन नाही. मोबाईल नाही. गावात जिल्हा परिषदेची पाचवीपर्यंत शाळा आहे. त्यामुळे कदाचित विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात वीज जरी कळली असेल तरी पण त्यांच्यासाठी आणि पाड्यातील आदिवासींसाठी ते दिवास्वप्नच होते.महावितरणचे अमरावती परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता सुहास मेत्रे, धारणीचे सहायक जिल्हाधिकारी विजय राठोड, कार्यकारी अभियंता दिलीप मोहोड, मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक आनंद जोशी यांच्या प्रयत्नाने तसेच अचलपूर कार्यकारी अभियंता दीपक सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली नाझिया खान, धारणी उपविभागाचे अभियंता विनय तायडे, ए.एस. पंचभाई, आर.बी.जरोदे व यांच्या पाठपुराव्यामुळे पाड्यापर्यंत वीज पोहचली व 'सौभाग्य' योजनेतून येथील सर्वच घरात वीज देण्यात आली.स्वतंत्र रोहीत्र, आदिवासी उपयोजनेतून खर्चमहाराष्ट्र ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानात समाविष्ट असलेले बुलुमगव्हाण हे गाव धारणीपासून ३० ते ३५ किमी. अंतरावर आहे. अतिदुर्गम भागातील या गावात भौगोलिक परिस्थितीमुळे व घनदाट वनांमुळे वीज पोहचविणे महावितरणसाठीही जिकिरीचे होते. यासाठी प्रथम काटकुमर ते बुलुमगव्हाण अशी ५ किमी. उच्च दाबाची विद्युत वाहिनी टाकण्यात आली. पाड्याला वीजपुरवठा करण्यासाठी एक रोहीत्र उभारण्यात आले. यासाठी लागणारा खर्च आदिवासीक्षेत्र उपयोजनेंतर्गत करण्यात आला.गावात ३० खांबांवर पथदिवेशंभर घरांची वस्ती असणाऱ्या या गावात सर्व घरी वीज पोहचावी, गावातील मार्गावर पथदिव्यांची सोय करता यावी, यासाठी ३० विजेचे खांब लावण्यात आले. प्रत्येक खांबावर महावितरणच्यावतीने पथदिवेही लावण्यात आले.

टॅग्स :mahavitaranमहावितरण