शिवाजी शारीरिक महाविद्यालयातून बुलेट लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:09 IST2021-07-18T04:09:58+5:302021-07-18T04:09:58+5:30
शाळेतील संगणक लंपास अमरावती : शाळा सुरू असताना शिक्षकाची नजर चुकवून संगणक लंपास करण्यात आला. ही घटना वनारसी जि.प. ...

शिवाजी शारीरिक महाविद्यालयातून बुलेट लंपास
शाळेतील संगणक लंपास
अमरावती : शाळा सुरू असताना शिक्षकाची नजर चुकवून संगणक लंपास करण्यात आला. ही घटना वनारसी जि.प. प्राथमिक शाळेत १५ दिवसांपूर्वी घडली. मुख्याध्यापक संजय आमले (५७) यांच्या तक्रारीवरून नागपुरी गेट पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
--------------------
कम्पाऊंडबाहेर उभी केलेली दुचाकी लंपास
अमरावती : वलगाव स्थित गणेडीवाल ले-आऊट येथील घराच्या कम्पाऊंडनजीक उभी केलेली एमएच २७ टी ८९२१ क्रमांकाची दुचाकी लंपास करण्यात आली. ही घटना १४ जुलै रोजी उघड झाली. नितेश गडलिंग (३६, रा. बळेगाव, ता अचलपूर) यांच्या तक्रारीवरून वलगाव पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
------------------------
घरासमोरून दुचाकी पळविली
अमरावती : घरासमोर उभी केलेली २५ हजारांची एमएच २७ एएल ४००७ क्रमांकाची दुचाकी अज्ञाताने पळविली. ही घटना न्यू प्रभात कॉलनीत १५ जुलै रोजी उघड झाली. अजय उत्तमसिंग गहरवार (४०) यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
-------------------
रस्त्यावर ऑटो लावून वाहतुकीस अडथळा
अमरावती : सार्वजिनक रस्त्यावर ऑटो उभा करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचे बडनेरा पोलिसांना गस्तीदरम्यान निदर्शनास आले. ऑटोचालक मो. समीर शेख आमीर (२७, रा. जुनी वस्ती)विरुद्ध बडनेरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
----------------------------
आदेशाचे उल्लंघन, गुन्हा दाखल
अमरावती : लॉकडाऊनचे नियम तोडून वेळेपेक्षा अधिक काळ दुकान सुरू ठेवल्याप्रकरणी डेली नीड्सच्या संचालकाविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला. ही कारवाई १४ जुलै रोजी रात्री १०.३० वाजता करण्यात आली.
------------------------
रस्त्यात वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा
अमरावती : रस्त्यात चारचाकी वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा आणल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई नागपुरी गेट पोलिसांनी लक्ष्मीनगरात गस्तीदरम्यान केली.
----------------------
ऑटोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
अमरावती : खोलापुरी गेट पोलीस ठाण्यांतर्गत हनुमाननगरात गस्तीदरम्यान रस्त्यावर ऑटो उभा करून वाहतुकीस अडथळा आणल्याचे निदर्शनास आले. त्यावरून पोलिसांनी ऑटोचालक सुधीर वासुदेव टेकाडे (४१, रा. गणोरी)विरुद्ध गुन्हा नोंदविला.
-----------
विनामास्क बिनधास्त फिरणाऱ्याविरुद्ध गुन्हा
भातकुली : बस स्टँडवर युवक विनामास्क बिनधास्त फिरताना पोलिसांना आढळला. संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याचेविरुद्ध गुन्हा नोंदविला. प्रकाश पुंडलिक जोगे (२६, रा. गणोरी) असे आरोपीचे नाव आहे.
-------------------
३५० रुपयांचा जुगार पकडला
अमरावती : फ्रेजरपुरा पोलिसांनी वरली-मटका अड्ड्यावर धाड टाकून ३५० रुपयांचा जुगार पकडला. ही कारवाई १५ जुलै रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास करण्यात आली. आरोपी प्रदीप यशवंत शिंगाडे (२५, रा. पंचशील, अमरावती) विरुद्ध गुन्हा नोंदविला.
-----------------------------
जुगार अड्ड्यावर धाड
अमरावती : पोलीस आयुक्त कार्यालयाच्या स्कॉडने १५ जुलै रोजी दुपारी १ वाजता दरम्यान जुगार अड्ड्यावर धाड टाकून ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी राजेंद्र सुरेश टेकाडे असे आरोपीचे नाव आहे.
-------------------------
हार-जितच्या खेळात दोघांविरुद्ध गुन्हा
अमरावती : बडनेरा पोलिसांना गस्तीदरम्यान आंबेडकर चौकात वरली-मटक्याच्या चिठ्ठी लिहिताना
दोघे आढळून आले. त्यांच्याजवळून २५५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा नोंदविण्यात आला. विजय गोपालसिंग ठाकूर (२४, राजपुतपुरा) कृणाल ऊर्फ मोंट्या विलास गायकवाड (२५, रा. नवसारी) अशी आरोपींची नावे आहेत.
-------------
मांडवा झोपडपट्टीतून दुचाकी लंपास
अमरावती : येथील मांडवा झोपडपट्टीत खरेदीकरिता गेलेल्या युवकाची एमएच २७ एई ३१५० क्रमांकाची २० हजारांची दुचाकी लंपास करण्यात आली. योगेश शरद बोरकर (३२, रा. प्रवीणनगर) यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी १६ जुलै रोजी गुन्हा नोंदविला.
----------------------
हातगाडी रस्त्यात, वाहतुकीला अडथळा
अमरावती : वर्दळीच्या रस्त्यावर वाहतुकीस अडथळा होईल या उद्देशाने मका भुट्टे विक्री करताना गाडगेनगर पोलिसांना आढळून आला. त्यावरून पोलिसांनी गजानन केरुजी दांडगे (रा. भीमनगर) विरुद्ध गुन्हा नोंदविला. ही कारवाई राधानगरात १६ जुलै रोजी करण्यात आली.
--------------
अस्तित्व लपवून बसलेल्या युवकाविरुद्ध गुन्हा
अमरावती : सूर्यास्तानंतर गुन्हा घडविण्याच्या उद्देशाने युवक अस्तित्व लपवून बसल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे सिटी कोतवाली पोलिसांनी इर्विन चौकात १६ जुलै रोजी गस्त केली. दरम्यान युवक तोंडाला रुमाल बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. प्रवीण बाबाराव दवंडे (३०, रा. कळमजापूर, ता. चांदूर रेल्वे) असे आरोपीचे नाव आहे.
-------------
वीजपुरवठा खंडित केल्यावरून धमकी
अमरावती : थकीत वीज देयक भरले नाही, अशा ग्राहकांची वरिष्ठांच्या आदेशाने वीजपुरवठा खंडित केल्याने वीजग्राहकाने कर्मचाऱ्याला शिवीगाळ करीत कामात अडथळा आणून धमकी दिली. ही घटना सुभाष चौकात १६ जुलै रोजी घडली. तक्रारीवरून राहुल राजेंद्र चव्हाण (३२, रा. संभाजीनगर, नवीवस्ती) विरुद्ध बडनेरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
----------------------
८७० रुपयांची देशी दारू जप्त
अमरावती : गुप्त माहितीच्या आधारे १६ जुलै रोजी धाड टाकून फ्रेजरपुरा पोलिसांनी २९ पावट्या देशी दारू जप्त केली. आरोपी राहुल दीपक खोडके (२३, रा. राहुलनगर) विरुद्ध गुन्हा नोंदवून समजपत्रावर सोडण्यात आले.
----------------------
गजानननगरातून अवैध दारू जप्त
अमरावती : फ्रेजरपुरा पोलिसांनी १६ जुलै रोजी गजानननगर, महादेवखोरी येथे धाड टाकून ९० पावट्या देशी जप्त केली. आरोपी बुधराम हरिराम चव्हाण (५३) विरुद्ध गुन्हा नोंदवून समजपत्रावर सोडण्यात आले.
-----------------
विषारी औषध प्राशन करून आत्महत्या
अमरावती : विषारी औषध प्राशन करून इसमाने आत्महत्या केल्याची घटना समाधाननगरात १४ जुलै रोजी घडली. ज्ञानेश्वर उत्तमराव धंदर (४०) असे मृताचे नाव आहे. फिर्यादी अमोल भोगांने यांच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मर्ग दाखल केला.
-------------------