चिखलदऱ्यात अतिक्रमणावर चालला बुलडोजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 06:01 IST2020-01-31T06:00:00+5:302020-01-31T06:01:03+5:30

चिखलदऱ्यात मिळेल त्या जागेवर नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांसह शासकीय कर्मचारी व रहिवाशांनी अतिक्रमण केले आहे. नगरपालिकेचे परिविक्षाधीन मुख्याधिकारी विकास मिणा यांनी गत आठवड्यात सर्व अतिक्रमणधारकांना नोटीस बजावून अतिक्रमण काढण्याचे सूचित केले होते. मात्र, त्यांनी नोटीसची दखल न घेतल्याने गुरुवारपासून कारवाईस सुरुवात करण्यात आली.

Bulldozer carried on encroachment in Chikhaldara | चिखलदऱ्यात अतिक्रमणावर चालला बुलडोजर

चिखलदऱ्यात अतिक्रमणावर चालला बुलडोजर

ठळक मुद्देकारवाई : पालिका उपाध्यक्षांच्या भावासह माजी नगरसेवकाचे बांधकाम जमीनदोस्त

चिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर नगरपालिकेतर्फे गुरुवारपासून अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी नगरपालिका उपाध्यक्षांच्या भावासह माजी नगरसेवकाच्या हॉटेलचे टीन शेड व पक्के बांधकाम बुलडोजरने जमीनदोस्त केले
चिखलदऱ्यात मिळेल त्या जागेवर नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांसह शासकीय कर्मचारी व रहिवाशांनी अतिक्रमण केले आहे. नगरपालिकेचे परिविक्षाधीन मुख्याधिकारी विकास मिणा यांनी गत आठवड्यात सर्व अतिक्रमणधारकांना नोटीस बजावून अतिक्रमण काढण्याचे सूचित केले होते. मात्र, त्यांनी नोटीसची दखल न घेतल्याने गुरुवारपासून कारवाईस सुरुवात करण्यात आली. अतिक्रमण हटाव पथक आणि प्रचंड पोलीस बंदोबस्तात गुरुवारी दुपारी १२ वाजतापासून अप्पर प्लेटो येथील नगरपालिकेच्या गाळ्यांमधील अतिक्रमण हटविण्यात आले. नगरपालिकेच्या खुल्या जागेवर उपाध्यक्ष शेख अब्दुल शेख हैदर यांच्या भावाचे पक्के अतिक्रमण बुलडोजरने जमीनदोस्त करण्यात आले. या कारवाईदरम्यान पालिका व पोलीस कर्मचाºयांना तैनात ठेवण्यात आले होते.

Web Title: Bulldozer carried on encroachment in Chikhaldara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.