बोराळ्याच्या शेतकऱ्यांचा सामूहिक आत्महत्येचा इशारा

By Admin | Updated: July 8, 2015 00:30 IST2015-07-08T00:30:37+5:302015-07-08T00:30:37+5:30

तालुक्यातील बोराळा येथील शेकार यांच्या शेतातील रोहित्रावरून परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीजपुरवठा गेला आहे.

Bulk farmers' collective suicide alert | बोराळ्याच्या शेतकऱ्यांचा सामूहिक आत्महत्येचा इशारा

बोराळ्याच्या शेतकऱ्यांचा सामूहिक आत्महत्येचा इशारा

अन्याय : मुख्यमंत्र्यांना पाठविले पत्र
चांदूरबाजार : तालुक्यातील बोराळा येथील शेकार यांच्या शेतातील रोहित्रावरून परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीजपुरवठा गेला आहे. या रोहित्रावर मर्यादेपेक्षा अधिक वीज जोडण्या दिल्यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक वीजपुरवठा होत नाही. या अतिरिक्त जोडण्या देण्यात वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ‘मलिदा’ लाटल्याचाही आरोप या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केला आहे.
गेल्या दोन वर्षापासून सदर १४ शेतकरी या रोहित्रावरील जोडण्या कमी करून नवीन रोहीत्र देण्याची मागणी करीत आहेत. मात्र सन २०१३ मध्ये नवीन रोहीत्र मंजूर होऊनसुद्धा वितरण कंपनीने नवीन रोहीत्र तर बसविले नाही व जुन्या रोहित्रावरील अतिरिक्त जोडण्या कमी केल्या नाहीत. त्यामुळे गेल्या वर्षी एकाही शेतकऱ्यांचे ओलीत होऊ शकले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांवर ‘मानवनिर्मित दुष्काळ’ ओढवला गेला. अद्यापही जुन्या रोहित्रावरील जोडण्या कमी करण्यात आल्या नाही व नवीन रोहीत्रही बसविण्यात आले नाही. त्यामुळे पुन्हा मानवनिर्मित दुष्काळ ओढवण्याची भीती या १४ शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. रोहित्रावरील अमर्याद जोडण्या व नवीन रोहीत्र बसविले नसल्यामुळे बोराळा येथील १८ शेतकऱ्यांचे सुमारे १२५ एकरांवरील सिंचन रखडले आहे. (तालुका प्रतिनिधी)

विनंती अर्ज विद्युत कार्यालयात पडून
तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी कृषिपंपाला वीजपुरवठा देण्यासाठी राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात केलेले विनंती अर्ज धूळ खात पडून आहेत. परिणामी शेतकरी वीज जोडणीपासून वंचित आहेत.

Web Title: Bulk farmers' collective suicide alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.